K C Pande with Baba Ramdev esakal
सप्तरंग

दगडांच्या देशा : गारगोटीचे जागतिक महत्त्व ध्यानात घ्या!

सकाळ डिजिटल टीम

लेखक : के, सी. पांडे

माझ्या जीवनात गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय (Gargoti International Museum) व शिर्डी साई संस्थान यांचे एक अतूट नाते राहिले आहे. शिर्डी येथील माझ्या नऊ एकर जमिनीत ‘साई अक्षरधाम’ हा जागतिक दर्जाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा मी संकल्प केला आहे. हा प्रकल्प जगातील वैविध्यपूर्ण रचना असलेला एका छत्राखाली अनेक बाबी असलेला नव्हे, तर परदेशातही एकमेव असेल, असा माझा मानस आहे. (Consider global importance of gargoti museum saptarang marathi article by k c pande nashik news)

गारगोटी संग्रहालयाला भेट देत पाहणी करताना बाबा रामदेव.

गारगोटी जगभर प्रसिद्ध झाल्यानंतर शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आठ वर्षांची माझी कारकीर्द अत्यंत समाधानकारक राहिली. या माध्यमातून मला साईबाबा व साईभक्त यांची वेगवेगळ्या प्रकारे निःस्वार्थपणे सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली. शिर्डी येथील माझ्या जमिनीत ‘साई अक्षरधाम’ हा प्रकल्प सुरू करण्याचा मी निश्चय केला. जेव्हा मी गारगोटीबद्दल मनाशी खूणगाठ बांधली होती, की यामुळे मला एक दिवस वैश्विक दर्जाची ओळख निर्माण होईल आणि ते खरे झाले. कुठलीही पार्श्वभूमी नसताना सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसीमध्ये मी गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना केली. नाशिकपासून वीस किलोमीटरवर असलेले संग्रहालय बघण्यासाठी देश-परदेशातून शेकडो लोक नियमितपणे भेट देत असतात. तेव्हाच माझ्या मनात विचार आला, की मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी नाशिक-सिन्नरमार्गे जावे लागते. साई दर्शनासाठी रोज हजारो लोक देशातील वेगवेगळ्या ठिकाणातून येत असतात. शिर्डी येथील माझ्या मालकीच्या जमिनीवर ‘अक्षरधाम’ या नावाने जागतिक दर्जाचा प्रकल्प उभा केला, तर तेथे अजून एक पर्यटनस्थळ शिर्डीत येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी उपलब्ध होईल. माझा साईभक्तीबद्दलचा सेवाभावही मला साकारता येईल.

शिर्डी येथील साई अक्षरधामचे संकल्पचित्र.

‘साई अक्षरधाम’ या प्रकल्पात साईंचा चित्रमय प्रवास, जगातील गारगोटी मिनरलचे एक्झिबिशन, जागतिक दर्जाचा लेझर शो, फूड हब, मिनरलॉजी रिसर्च सेंटर, ऑडिटोरियम, प्रशस्त पार्किंग, साई अक्षरधामचे वैविध्यपूर्ण स्ट्रक्चर, हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड, मेडिटेशन हॉल, काचेची एक स्वतंत्र इमारत कलाकृतीद्वारे त्यास डायनासोरचा आकार देऊन बनविण्यात येईल. गार्डन, योगा सेंटर अशा एक ना अनेक सेवा तेथे देण्यात येतील.

आपला देश यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक व मानवनिर्मित पर्यटन लाभलेल्याचा वारसा आहे. पर्यटनास वाव मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असते. पण यात शासनाने अधिक सजग होणे गरजेचे आहे. ताजमहल, अजिंठा, वेरूळ याव्यतिरिक्तही अनेक पर्यटन क्षेत्रे आहेत, यात गारगोटीचाही समावेश आहे, अशी शासनदरबारी नोंदही आहे. पण शासनाकडून पर्यटन क्षेत्रासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. ‘साई अक्षरधाम’सारख्या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाची शिर्डीत निर्मिती केल्यानंतर स्थानिक लोकांना रोजगार सभोवतालच्या परिसराचा विकास, कर स्वरूपात शासनाला मिळणारा महसूल असे अनेक फायदे शासनास होणार आहेत. तरीही काही बाबतीत शासनदरबारी उदासीनता आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थ भांडवल लागणार आहे. वित्तपुरवठा करणाऱ्या बकांनी त्यांच्या पॉलिसीत काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. गारगोटीची ओळख जागतिक स्तरावर आहे, तर निश्चितच गारगोटीची श्रीमंती ही आपोआपच लक्षात येईल.

प्रस्तावित साईअक्षर धाममधील काचेची इमारत असे अशा आकाराची.

नाशिक-सिन्नर रस्त्यावर असलेले गारगोटी संग्रहालय नाशिक शहरापासून वीस किलोमीटरवर असूनही देशातून तसेच जगभरातून लोक नियमितपणे भेट देत असतात. यावरूनच जगात गारगोटीचे काय स्थान आहे, हे वित्तीय संस्थांनी समजून घेण्याची गरज आहे. त्याचे योग्य मूल्यमापन करून पुढे यावे, असे माझे मत आहे. (लेखक सिन्नरस्थित आंतरराष्ट्रीय गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

कॅव्हनसाइट

कॅव्हनसाइट

रासायनिक रचना : कॅल्शियम व्हॅनेडियम सिलिकेट

फायदे : कॅव्हनसाइट हा एक दगड आहे, जो विविध मानसिक समस्यांसह मदत करू शकतो. तिसरा डोळा आणि तिसरा डोळा उत्तेजित करून ते अंतर्ज्ञान, मानसिक जागरूकता आणि चॅनेल प्रतिभा नाटकीयरीत्या वाढवू शकते. हे मानसिक उपचारांमध्ये खूप फायदेशीर आहे.

परिसर : पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT