सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ७ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार : माघ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.५०, सूर्यास्त ६.४१, चंद्रोदय रात्री २.५५, चंद्रास्त दुपारी १.११, श्रीरामदास नवमी, भारतीय सौर फाल्गुन १६ शके १९४२. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९११ : नामवंत हिंदी साहित्यिक, वृत्तपत्रकार  व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन ‘अज्ञेय’ यांचा जन्म.
१९२२ : मराठी रंगभूमीवरील असामान्य अभिनेते गणपतराव जोशी यांचे निधन. शेक्‍सपिअरच्या नाटकातील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या.
१९६१ : भारताचे पहाडी पुरुष गोविंदवल्लभ पंत यांचे निधन. त्यांना १९५७  मध्ये ‘भारतरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
२००२ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस, प्रवक्ते, ज्येष्ठ हिंदी पत्रकार, साहित्यिक आणि माजी राज्यमंत्री डॉ. राममनोहर त्रिपाठी यांचे निधन.
२००३ : प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ आणि राज्याच्या अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विभागाचे माजी संचालक सुधाकर विद्वांस यांचे निधन. त्यांच्या कारकिर्दीतच राज्याचा पहिला आर्थिक अहवाल सादर झाला.
२००३ : देशी बनावटीच्या पाणतीराची भारताची यशस्वी चाचणी. पाणतीराची निर्मिती करणाऱ्या मोजक्‍या देशांत भारताला स्थान मिळाले आहे.
२००० : साहित्यिक आणि चित्रपटकथालेखक प्रभाकर तामणे यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल.संततीसौख्य लाभेल.
वृषभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कौटुंबिक जीवनात लक्ष देवू शकाल.
मिथुन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. 
कर्क : दानधर्मासाठी खर्च कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.नवीन परिचय होतील.
सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. संततीसौख्य लाभेल.
कन्या : प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. 
तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.
वृश्‍चिक : अनपेक्षितरित्या उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
धनु : विरोधकांवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.नवीन परिचय होतील.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मान व प्रतिष्ठेचे योग येतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT