Sabrina_Singh
Sabrina_Singh 
सप्तरंग

Women's day 2021 : अमेरिकेत आजोबांचा वारसा जपणारी नात!

सकाळ वृत्तसेवा

Women's day 2021 : भारतीयांच्या स्थलांतरास अधिकृत मान्यता आणि अमेरिकेतील वांशिक मतभेदाविरोधात आवाज उठविणाऱ्या आजोबांची नात आज व्हाइट हाउसमध्ये उच्चपद भूषवीत आहे. भारतीयांसाठी महत्त्वाचा ठरलेला ‘लूस-सेलर’ कायदा लागू झाल्याच्या घटनेला ४६ वर्षे उलटल्यानंतर यासाठी झटलेल्या जगजितसिंह ऊर्फ जे. जे सिंह यांच्या तिसरी पिढीतील सबरिनासिंह (वय ३३) या भारतीय वंशाच्या युवतीकडे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्हाइट हाउसच्या प्रेस उपसचिवपदाची सूत्रे विश्‍वासाने सोपविली आहेत.

राजकीय कामाचा अनुभव
सबरिनासिंह या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यासाठी प्रेस उपसचिवपदावरून काम पाहणार आहेत. या महत्त्वाच्या पदावर निवड झालेल्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. कमी वयात उच्चपदापर्यंत पोचलेल्या सबरिना यांनी याआधीही अमेरिकेतील राजकीय नेत्यांबरोबर काम केले आहे व डेमोक्रॅटिक पक्षाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. या पक्षातील सदस्यांसाठीच्या प्रचार समितीच्या माध्यम साहाय्यक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरूवात केली होती.

प्रचार मोहिमांची जबाबदारी
कमला हॅरिस या कॅलिफोर्नियाच्या सिनेटर असताना सबरिना त्यांच्या माध्यम सचिव होत्या. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत ‘ब्लूमबर्ग’ या कंपनीचे मालक मायकेल ब्लूमबर्ग यांच्यासाठी त्‍यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नेमणूक झाली होती. तसेच न्यूजर्सीच्या सिनेटर कोरी बुकर यांच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठीही सबरिना यांनी राष्ट्रीय माध्यम सचिव म्हणून काम केले आहे. एवढेच नाही तर २०१६ मधील अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेत जनसंपर्क संचालकपदाची तर ‘अमेरिकन ब्रिज’ने उभारलेल्या ट्रम्प वॉर रुमच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांनी पेलली आहे.

कुटुंबाचे योगदान अन् साथ
जगजितसिंह ऊर्फ जे. जे सिंह यांनी अमेरिकेत १९४०मध्ये वंशवादाविरोधात आणि स्थलांतराच्या हक्कासाठी इंडियन लीग ऑफ अमेरिका’ (आयएलए) या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले होते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय-अमेरिकन समुदायाच्या हितासाठी ही संघटना काम करते. या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन अध्यक्ष हॅरि ट्रुमन यांनी २ जुलै १९४६ मध्ये ‘लूस-सेलर’ हा कायदा मंजूर केला आणि त्याकाळात दरवर्षी १०० भारतीयांसाठी अमेरिकेची दारे खुली झाली.

आजोबांना पाहिले नसले तरी त्यांच्या कार्याचा अभिमान सबरिना यांना आहे. तसेच जीवनात जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्यावर वडील मनजितसिंह आणि आई सरिलासिंह यांचा मोठा प्रभाव आहे, असे त्या आदराने सांगतात. सबरिना यांचे पती माईक स्मिथ हेही राजकारणाशी संबंधित असून अमेरिकेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह’च्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांचे ते राजकीय संचालक आहेत.

- संपादकीय लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT