Farmers Strike
Farmers Strike 
सप्तरंग

शेतकऱयांना हमीभावाचं संरक्षण मिळालं, तर तुमचं काय दुखलं?

श्रेणिक नरदे

स्मिता पटवर्धन या नेहमी शेतकऱयांना सल्ला द्यायला उत्सुक असतात. यापूर्वीही याच पटवर्धन बाईंनी शेतकरी पाच-पाच अपत्ये जन्माला घालतो, असा सर्वे करून अकलेचे तारे तोडले होते. आता शेतकरी संपावरही शेतकऱ्यांची विपरीत बुद्धी आहे, असे बाईंचे म्हणणे पडले आहे.

बाई म्हणतात, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर बँका बुडतील. युपीए सरकारच्या काळात कर्जमाफी केली, बँका बुडाल्या का? कधीकधी असं वाटत की मागे कर्जमाफी झाली तेव्हाच स्मिता पटवर्धनांची बँकेतील नोकरी गेली असावी. 

दुसऱया ठिकाणी म्हणतात, शेतकऱ्यांनी लग्नाला, बारशाला अगदी मयताच्या जेवणाला ही कर्जातले पैसे वापरु नयेत. नोकरदार कंपनीमधून अॅडव्हान्स घेवू शकतो. दुर्दैवाने शेतकऱयाला कोण अॅडव्हान्स देत नाही. त्यावरही कळस म्हणजे तूर खरेदी करून तीन महिने उलटल्यावरही पैसे मिळत नाहीत म्हणून आंदोलन करावे लागते. ऊसाचीही दशा निराळी नाही. मग आम्ही कर्ज काढलं तर बिघडलं कुठं तुमचं?

स्वामीनाथन आयोग लागू करायलाही विरोध करतात स्मिताम्याडम. कारण काय देतात, तर आवकेवर किंमती ठराव्या असं त्यांच म्हणणं आहे. जगातील इतर कोणत्याही वस्तु या उत्पादन किंमतीपेक्षा आतबट्ट्यात येऊन विकल्या जात नाहीत. तिथं शेतकऱ्यांना हमीभावाचं संरक्षण भेटलं तर तुम्ही दुखवायचं काय कारण आहे?

पेन्शन मागणीलाही त्या विरोध करतात. ठीक आहे. एकवेळ पेन्शन नसेल तर चालेल; पण दर दहा वर्षांत शेतमालाचा दर वाढतो म्हणणे म्हणजे शुद्ध हलकटपणा आहे. कांद्याचंच उदाहरण घ्या. कुत्रंही हुंगत नाही. शेतकऱयांना खिशातले पैसे घालून पट्टी पूर्ण करायला लागते. तिथे पटवर्धनबाई म्हणतात, शेतमालाच्या किमंती वाढल्यात.

पुढे त्या म्हणतात, दुधाचीही आवक बघून दर द्यावा. पशुधन पहिली तीन-चार वर्षे फुकट पोसावी लागतात. त्यात शेण सोडून काही इनकम नसते आणि वासरू असल्याने गोमुत्र पण विकता येत नाही. त्यामुळे पहिली तीन वर्षे हे ऐतखावू जनावर चौथ्या वर्षी नशिबात असले तर दुध देऊ लागते. वैरणी, पशुखाद्य, औषधोपचार यांच्या वाढीव किमतींचा विचार करता म्हशीचे दुध ऐंशी लिटरखाली खरेतर परवडत नाही.

समृद्धी महामार्ग हा गरज नसताना एखाद्या बालीश नेत्याच्या हट्टापाई तमाम शेतकऱयांच्या उत्पादन देणाऱया चांगल्या शेतीची वाट कशापायी लावावी?

शहरांनीही कालच्या संपात साथ दिली असतांना पटवर्धन बाई म्हणतात, शहरी लोकांवर ग्रामीण लोक जळतात. 

आम्ही कशाला त्यांचा द्वेष करू. शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य झाल्या तर कुठतरी शेतकरी ग्रामीण भागात स्थिरावेल नाहीतर शहरांच्या गटाऱया अशापण वाढतच आहेत...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT