umesh-charole
umesh-charole 
सप्तरंग

रंगसंवाद :  कलात्मक वास्तववाद! 

महेंद्र सुके

समाजात घडत असलेल्या घटनांचे, परिस्थितीचे पडसाद कलाकृतींतही उमटतात. त्यामुळे कलानिर्मिती ही समाजमनाचा आरसा समजली जाते. लॉकडाउनचे बरेवाईट परिणामही चित्रकलाकृतीत उमटले आहेत. नागपूरचे चित्रकार उमेश चारोळे यांची दोन चित्रे ‘लॉकडाउन’वर भाष्य करणारी आहेत. 

यातील घरातून दिसणारे ‘कुलूप बंद’ गेट आणि परिसर अंतर्मनातील भावभावनांचे दर्शन घडवते. या काळात काय उपाययोजना कराव्या लागल्या आणि कंपाउंडची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडल्यास काय घडू शकते याचा विचार मनाचा ताबा घेतो. आपल्याच घराच्या कुंपणाला असलेले कुलूप लावून ‘घरात सुरक्षित’ राहण्याचा संदेश या चित्रातून कलाकाराला द्यायचा आहे. 

ॲक्रेलिक ऑन कॅन्व्हासवरची ‘लॉकडाउन’ ही कलाकृती वास्तवावर कलात्मक भाष्य करणारी आहे. या चित्रात मानवी चेहऱ्याला केंद्रबिंदू ठेवून मास्क, कोरोना, कुलूप, किल्ली अशा वेगवेगळ्या प्रतिकांचा वापर करून ‘लॉकडाउन’ बिंबवले आहे. चित्रात जाणीवपूर्वक काळा रंग वापरला आहे. मुखवट्यावरचा प्रकाश अधिक स्पष्ट आहे. त्यातून उमेश यांनी उद्याचा आशावाद नोंदवला आहे. 

उमेश यांनी मास्टर ऑफ फाइन आर्टस ही पदवी संपादन केली आहे. ते उत्तम व्यंग्यचित्रकारही आहेत. त्यांनी तयार केलेल्या कलाकृतींना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. देशभरातील विविध शहरांत त्यांनी साकारलेल्या चित्रांची आजवर २५ हून अधिक प्रदर्शने भरली आहेत. त्यात मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर कलादालनात त्यांची चित्रे चार वेळा प्रदर्शित झाली आहेत. लॉकडाउनच्या काळातील स्वच्छ वातावरण चित्रकारांना नवनिर्मितीसाठी प्रेरणा देणारे ठरले व नव्या रंगसंगतीनेही जन्म घेतला. ही रंगसंगती चित्रे रेखाटण्यासाठी उमेश यांना उत्तम संधी वाटली. हे निसर्गसौंदर्य लॉकडाउननंतर असेच अबाधित राहावे, ही त्यांची अपेक्षा आहे. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT