सप्तरंग

हत्ती, श्रीलंका अन् भारत!

प्रज्ञेश मोळक (साकू)

भारतात जे त्या हत्तीणी बरोबर घडलं ते फारच वाईट होतं. माणूसकीला कलंक लावणारं होतं. हत्ती किंवा इतर कुठलेही प्राणी यांचा व्यवस्थितीत सांभाळ करता येतो. अशी जगात अनेक उदाहरणं आहेत. पण लांब कशाला जायचे? भारताच्या छोट्या भावाचं उदाहरणच बघूया की... समजून घेऊया आणि जमल्यास थोडा मोठेपणा दाखवून त्याचं अनुकरणसुद्धा करुयात. तर श्रीलंकेत १९७५ साली Department of Wildlife Conservation अंतर्गत ‘The Pinnawala Elephant Orphanage’ ची स्थापना झाली. 

जंगलात सापडलेल्या अनेक हत्तींना एकत्र आणलं गेलं. पूर्वी त्यांना Wilpattu National Park येथे ठेवण्यात आलं, नंतर बेनटोटा येथे हलवण्यात आलं, मग Dehiwala Zoo येथे हलवलं. हे सारं काही वर्षांसाठी केल्यानंतर पिन्नावाला गावात शेवटी सगळ्या हत्तींना सुखरुप हलवलं. त्यांना नीट खाद्य मिळावं, त्यांची काळजी घेतली जावी यासाठी हा हत्तींचा अनाथाश्रम उभारला गेला. त्यासाठी नदीकाठी २५ एकर जमीन राखीव ठेवण्यात आली. 

जवळपास १०० हून अधिक हत्ती तिथे राहतात. काही male elephants तर काही female elephants आणि baby elephants राहतात व त्यांच्या ३ पिढ्या तिथे दिसून येतात. तिथे हत्तींचे प्रजनन (breeding) देखील केले जाते. १९८४ ला ‘सुकुमाली’ नावाची हत्तीणीचा जन्म झाला अन् तेव्हापासून २०१५ पर्यंत ७० नव्या हत्तींचा जन्म झाला. काहींना जंगलात सोडलं तर काहींना खासगी मालकांकडे. परंतु त्यांची नीट काळजी घेतली जाते की नाही याचं tracking एकदम काटेकोरपणे ते करतात. म्हणजेच काय तर असलेले हत्ती वाचवले, जगवले, वाढवले आणि एक ‘रोल मॉडेल’ तयार झाले!

जगातील सर्वात जास्त हत्ती एका ठिकाणी असलेलं हे पिन्नावाला गाव. असं क्वचितच होतं की पर्यटक श्रीलंकेला जातात आणि तिथे जात नाही. पर्यटक हमखास तिथे भेट देतातच. आणि तेही तिकिट काढून भेट देतात. आपल्याला हत्तींना अंघोळ घालता येते. त्यांना जेवण देता येतं. त्यावर मनसोक्त फिरता येतं. आणि या सगळ्यासाठी थोडे बहुत पैसे घेतले जातात. त्या पैशातून तेथील देखभाल केली जाते. पर्यावरण जपत, प्राण्यांची काळजी घेत एक अगळं वेगळं पर्यटन ‘रोल मॉडेल’ श्रीलंकेने उभं केलंय. 

श्रीलंका हा देश तुलनेनं पश्चिम महाराष्ट्रपेक्षा थोडा मोठा असेल. तरी तेथील जंगल, protected sites, national parks, zoo इत्यादी ठिकाणं अफलातून आहेत. भारतात अभयारण्य बरीच आहेत. ती भारी पण आहेत. मात्र असं हत्तींसाठी orphanage किंवा conservation/care centre फक्त केरळमधील कोट्टूर येथे व उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यात भारताचे पहिले आणि एकमेव ‘हत्ती संवर्धन आणि काळजी केंद्र’ स्थापन झाले आहे. तेही कधी? तर २०१० साली. तिथे जाण्याचा योग कधी आला नाही. चांगलं ही केलं असेल परंतु भारत केवढा मोठा, श्रीलंका अगदी छोटा देश. अशा बाबतीत तुलना करायलाच पाहिजे. 

म्हणूनच सुरुवातीला म्हंटलं तसं भारत त्याच्या छोट्या भावाकडून म्हणजेच श्रीलंकेकडून थोडा मनाचा मोठेपणा दाखवून काही शिकणार का, हा प्रश्न आहे. एवढे परदेशी दौरे भारत सरकार किंवा इतर राज्य सरकारे करतच असतात. एखादा अभ्यास दौरा ‘The Pinnawala Elephant Orphanage’ येथेही काढावा ही आपेक्षा करण्याखेरीज आपल्या हातात आहे तरी काय?

इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT