K C Pande With his wife at sai baba jhopdi
K C Pande With his wife at sai baba jhopdi esakal
सप्तरंग

दगडांच्या देशा : साईभक्तीतून मिळते नवचैतन्य

सकाळ डिजिटल टीम

लेखक : के. सी. पांडे

व्यक्ती ज्या भावनेच्या योगाने ईश्वराला सर्वथा शरण जातो, ती भावना म्हणजे भक्ती (Bhakti) होय. ईश्वराविषयीचे (God) आत्यंतिक व अनन्य प्रेम म्हणजे ईश्वराची भक्ती, असेही म्हणता येईल. ईश्वराचा अनुग्रह करून देण्याचे सामर्थ्य असलेली आचारपद्धती म्हणजे ईश्वरप्राप्तीचा मार्ग होय. वेगवेगळ्या तत्त्वचिंतकांनी ईश्वराचा अनुग्रह मिळविण्याचे जे मार्ग सांगितले आहेत, त्यापैकी ईश्वरभक्ती हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची व्यक्तीच्या मनातील श्रद्धा, सेवाभाव, समर्पणवृत्ती, भीती, ईश्वराचा अनुग्रह वा साक्षात्कार मिळविण्याची उत्कट इच्छा इत्यादींमधून व्यक्तीच्या मनात भक्तीची भावना स्फुरते. (Sai Bhakti gives you rejuvenation saptarang Marathi Article by K C Pande Nashik News)

ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वगुणसंपन्न, सृष्टीचा निर्माता आणि आपला उद्धारकर्ता आहे, हा विश्वासच या भावनेच्या निर्मितीला कारणीभूत होतो. या व्यापक अर्थाने जगातील सर्व समाजातून भक्तिभावना आढळते. भारतात भक्तीचा विशिष्ट संप्रदाय असून, त्याची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत. या संप्रदायालाच ‘भक्तिमार्ग’असे म्हणतात. विविध देवता, माता, पिता, गुरू याविषयीच्या आदरभावालाही भक्ती असे म्हटले जाते.

मातृभक्ती व ईश्वरभक्ती माझ्यामध्ये काठोकाठ भरलेली होती. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर या दोघांशिवाय आपणास पर्याय नाही. या दोन गोष्टी टाळून आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. आयुष्याच्या वाटचालीत येणारा संघर्ष त्यातून मिळणार. यशाचा सर्वांत मोठा पाया ईश्वरभक्ती व मातृभक्ती आहे.

शिर्डीच्या साईबाबांची पूजा करताना श्री. पांडे.

गारगोटी मिनिरलचा छंद जोपासल्यापासून मी अनेक ठिकाणी रॉक हंटिंगसाठी जात असे. देशात-परदेशात महाराष्ट्रातील विविध भागात मी प्रचंड प्रवास केला. दरम्यान, १९८६ मध्ये माझे मित्र डॉ. जवेरी यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मी प्रवास केला. त्या वेळी शिर्डीच्या अलीकडे काही गावांमध्ये मी डॉक्टरांसोबत दगड शोधण्याचे काम केले. त्यानंतर आम्ही शिर्डी येथे गेलो. माझे मित्र मला साईबाबांच्या दर्शनासाठी घेऊन गेला. ईश्वरभक्ती माझ्या मनात काठोकाठ भरलेली होती. माझ्या आईची हीच शिकवण होती. त्यामुळे आकर्षणापोटी मीही त्यांच्याबरोबर गेलो. तेथे गेल्यानंतर माझे मित्र म्हणाले, ‘शिर्डीचे साईबाबा हे खूप जागृत देवस्थान आहे. येथे तुम्ही काही मागितले तर तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला जे मागायचे असेल ते तुम्ही साईबाबांचे नमन करत मनातूनही मागू शकता. साईबाबा तुम्हाला निश्चित आशीर्वाद देतील.’

साईबाबांच्या झोपडीचे सपत्नीक दर्शन घेताना.

माझा स्वभाव सुरवातीपासूनच वेगळा होता, मी त्यांना म्हणालो, ‘मला आशीर्वादरूपी साईबाबांकडून जे काही मागायचे आहे ते मी तुमच्यासमोरच मागील. तुम्हाला ऐकू जाईल अशा आवाजात मागेल’, आणि मी तसेच केले. साईबाबांना प्रार्थना करतो, की माझ्या या जगावेगळ्या छंदाला आपण कायम सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देण्याची माझ्यात ऊर्जा निर्माण होऊ द्या, हीच माफक अपेक्षा.

साईबाबांची समाधी.

साईबाबांचा मंदिर परिसर, गाभारा, मुखदर्शन यातून एक नवचैतन्य प्राप्त होते. मलाही त्याची अनुभूती आली. त्यातून माझ्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होण्यास भविष्यात खूप मदत झाली व व्यवसायाच्या संघर्षात पावलापावलावर साईबाबा आशीर्वादरुपी माझ्या पाठीशी आहेत, याची प्रचीती नियमितपणा मला अनुभवयास मिळाला. साईबाबांनी आपल्या आयुष्यानुसार स्वतःला साकार करण्याचे महत्त्व सांगितले आणि विनाशकारी गोष्टींवर असलेल्या आपल्या प्रेमावर टीका केली. त्यांच्या शिकवणींमध्ये प्रेम, क्षमा, इतरांना मदत करणे, दान, समाधान, आंतरिक शांतता आणि देव आणि गुरूची भक्ती यावर आधारित आहे. दैवी चेतनाच्या मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या सद्‌गुरूला शरण जाण्याचे महत्त्व यावर त्यांनी जोर दिला.

तेव्हाच मी माझ्या मनाशी निश्चय केला, की माझ्या आयुष्यातील पुढील सर्व कालावधी हा साईबाबांच्या भक्तिप्रति समर्पित झाला. मला जगभर मिळालेले यश, प्रसिद्धी, प्रतिष्ठा या सर्व वाटचालीत शिर्डीच्या साईबाबांचे आशीर्वादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

ॲपोफिलाइट

४५०० किलो व दहा फूट रुंद असलेला ॲपोफिलाइट

पोटॅशियम कॅल्शियम फ्लोरिन हायड्रॉक्साइड.

फायदे : ग्रीन अॅपोफिलाइट क्रिस्टल्स प्रेमाची ऊर्जा वाहून नेतात. हे स्फटिक तुमच्या जागेत शांतता, सुसंवाद आणि विपुलता आणेल. हे तुमच्या हृदयचक्रातील ऊर्जा शुद्ध आणि संतुलित करू शकते. तुमच्या अंतःकरणात नसलेली आणि तुम्हाला पूर्ण वैभवात प्रेमाचा अनुभव न घेण्यास कारणीभूत असलेली कोणतीही गोष्ट काढून टाकली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT