सप्तरंग

अनाथ व मनोरुग्णांसाठी ‘यशोधन ट्रस्ट’

सकाळ डिजिटल टीम

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. या वेबसाईटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची मािहती दिली जाईल. त्यातील पहिला भाग .... 

पुण्यावरून साताऱ्याकडे जाताना खंबाटकी घाटाजवळ वेळे गावाच्या हद्दीत समाजातील अनाथ, बेघर वयोवृद्ध, मनोरुग्ण लोकांसाठी ‘यशोधन ट्रस्ट’ स्वयंसेवी संस्थेद्वारे संचलीत गजानंत निवारा केंद्र आहे. वाई तालुक्यातील रवी बोडके या तरुणानं समाजानं नाकारलेल्या लोकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी ‘यशोधन ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेचे स्थापना केली.

शेतकरी कुटुंबात रवी बोडके लहानाचे मोठे झाले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली. आपण समाजाचं काही तरी देणं लागतो, या भावनेनं समाजातील गरजू, निराधार, अनाथ, बेघर मनोरुग्ण आणि वंचितांसाठी २००५ मध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. ज्या वयात नोकरी करून पैसे कमवायचे, त्या वयात समाजसेवेचं व्रत हाती घेतलं होतं. घरातील लोक नाराज होते. पण बोडके यांनी मदतीचं काम सुरू ठेवलं. २०१२ पासून यशोधन ट्रस्टच्या कामाचा व्याप वाढला. अनेक अनाथांना व निराधारांना मदत करताना अनंत अडचणी येऊ लागल्या त्यात प्रमुख अडचण अशी होती, की रस्त्यावरील अनाथ - बेघर मनोरुग्णांना ठेवायचं कुठे? त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सर्वांत मोठा होता. बोडके यांनी अनाथांसाठी स्वतःचा निवारा केंद्र सुरू करण्याचं ठरवलं. सुरुवातीला भाड्याच्या जागेत निवारा केंद्र सुरू केलं.

रस्त्यावरून या अनाथांना व मनोरुग्णांना उचलून आणायचं, स्वच्छ करायचं, डॉक्टरांकडे उपचारांसाठी न्यायचं असा दिनक्रम सुरू झाला. काही दिवस अशा लोकांना निवारा केंद्रात ठेवून त्यांची योग्य सर्वप्रकारची काळजी घेऊन, काही दिवसांनी संस्थेमार्फ़त अशा अनाथ, बेघर लोकांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना आपापल्या कुटुंबात सुरक्षित पोहोचविलं जातं. तसंच मानसिक रुग्णांना पुढील उपचारांसाठी मनोरुग्णालयात दाखल केले जाते. अशा मनोरुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन, कुटुंबाच्या ताब्यात दिले जातात. सध्या ४५ अनाथ - बेघर व मनोरुग्ण आहेत.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

आजपर्यंत ‘यशोधन ट्रस्ट’च्या माध्यमातून हजारो लोकांना मदत झाली आहे, अनेक अनाथ - बेघर व मनोरुग्णांना हक्काचा निवारा मिळाला आहे. आज ‘यशोधन ट्रस्ट’च्या मालकीच्या जागेत गजानंत निवारा केंद्र सुरु आहे. काही वयोवृद्धांना आपल्याच पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडलेलं असतं, अशा वयोवृद्धांनाही यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून निवारा दिला जातो. तसंच कालांतरानं त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना भेटून त्यांचं समुपदेशन करून अशा वयोवृद्धांना परत त्यांच्या कुटुंबाबत पाठविलं जातं. काही नातेवाईक परत नेण्यासाठी तयार होतात, तर काही तयार होत नाहीत. अशा वेळी अशा वयोवृद्ध लोकांना यशोधन ट्रस्ट संचालित निवारा केंद्रात शेवटपर्यंत सांभाळले जाते. निवारा केंद्रातील एखाद्या वयोवृद्धांचं निधन झाले, तर संस्थेकडून संबंधित मुलांना व नातेवाईकांना कळविलं जाते. परंतु काही मुलं अंत्यसंस्काराला सुद्धा येत नाहीत. अशा वेळी संस्थेकडूनच अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे ‘यशोधन ट्रस्ट’द्वारे माणुसकी जिवंत ठेवण्याचं काम केलं जात आहे. आपणही या कार्याला देणगीरूपाने हातभार लावू शकतो.


आर्थिक मदतीची नितांत गरज...
‘यशोधन ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. संस्थेचा दिवसाला होणारा खर्च खूप मोठा आहे. त्यातही अनाथ - बेघर व मनोरुग्णांच्या आरोग्य तपासणी व औषध - उपचारांचा खर्च मोठा आहे. संस्थेला सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर यशोधन ट्रस्ट च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती - तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी - भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन यशोधन ट्रस्टच्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटणावर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ‘८० जी’ हे प्राप्तिकरातील ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT