Diwali Festival esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : तेजोमय दीपावलीत भविष्याची बीजे...!

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

कोरोना नंतरच्या दोन वर्षांच्या मुक्त वातावरणातील दीपावलीने न भूतो असे उद्योग, व्यवसायाचे भवितव्य रेखाटल्याने आशेचा नवा किरण उदयाला आला आहे. जवळपास ५०० कोटींच्या वर नाशिकच्या बाजारपेठेत उलाढाल झाल्याने सकारात्मक वातावरण तयार झाले. हीच काहीशी स्थिती खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील बाजारपेठांची होती. हे सकारात्मक वातावरण असेच कायम राहिले पाहिजे. मात्र त्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. (Saptarang Latest Marathi Article by Dr Rahul Ranalkar sahyadricha matha nashik news)

मागील आठवडा हा दिवाळीच्या धामधुमीचा काळ. या काळात नाशिककरांच्या आणि खानदेशातील जनतेच्या उत्साहाला उधाण आले होते. दिवाळी संपून आता व्यवहार पूर्ववत होत असताना दिवाळीच्या दिवसांकडे नजर टाकणे महत्त्वाचे वाटते. त्याला कारण म्हणजे यंदाच्या दीपावलीमध्ये भविष्याच्या वातावरणाचे बीज निश्चितपणे रोवले गेले आहे. गेली दोन वर्षे सर्वजण कोरोनाच्या महामारीला सामोरे गेले.

या कालावधीत सर्वच कुटुंबांचा दोन वर्षे आरोग्याशी संघर्ष पाहायला मिळाला. आरोग्याशी संघर्ष करताना लॉकडाऊनचा पर्याय शासनाला दिसला. प्रत्येकाने काही काळ का होईना स्वतःला घराच्या आत कोंडून घेतले. या कोंडमाऱ्याने अनेकांमधील माणुसकीची जाणीव जागृत झाली. ‘जान है तो जहाँन है’ हे प्रत्येकाला जणू पटले-समजले. दोन वर्षात जगात अनेक उलथापालथी झाल्या. या अनुभवातून प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद मिळाली. नव्या जगण्याचा परिणाम हा यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेतील उत्साहातून ठळकपणे दिसून आला.

या दिवाळीत प्रत्येकाने थोडा का होईना, जरा जास्तच खर्च केला. कपडे, नवीन वस्तू, स्थावर मालमत्ता अशा कुठल्याही प्रकारच्या खरेदीत हात आखडता न घेता नाशिककर बाजारात खरेदीसाठी अक्षरशः तुटून पडले. या कृतीतून भविष्यातील बाजारपेठ नवे संकेत देत आहे. ही वाटचाल अधिक उन्नतीसाठी पोषक ठरणारी आहे. बाजारपेठेत न भूतो अशी खरेदी झाली. केवळ नाशिकच्या बाजारपेठेत ५०० कोटींवर झालेल्या खरेदीमुळे बाजारात चैतन्य उसळले. मागील दोन वर्षांची ही कसर ग्राहकांनी भरून काढली.

त्याचबरोबर यापूर्वी कधीही न झालेली उलाढाल देखील नाशिकसह खानदेशात व्यावसायिकांनी अनुभवली. बाजारपेठेत नागरिक उतरले त्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली व त्यातून बाजारपेठेला चैतन्य मिळाले. याचाच अर्थ खर्च करण्याच्या ग्राहकाच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. लोक आता खर्च करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. खरेदीचा हा टेम्पो कायम ठेवण्यासाठी दुसऱ्या बाजूने म्हणजे व्यवसायिकांनी देखील हात आखडता घेण्याची आवश्यकता नाही. ग्राहकांचा विश्वास अधिक कसा वाढविता येईल, याची जबाबदारी आता व्यावसायिकांवर नव्याने आली आहे.

‘ग्राहक देवो भव’ हे ब्रीद आता प्रत्येक व्यावसायिकाने अंगीकारणे गरजेचे आहे. तर आणि तरच बाजारपेठेतील चैतन्य कायमस्वरूपी टिकून राहील. लोकांच्या अपेक्षा आता अधिक वाढत जातील, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी पेलावी लागेल. दीपावलीच्या निमित्ताने बाजारपेठेतील झालेली उलाढाल ही फार मोठी आहे. मेट्रो शहरांच्या जवळपास असलेली नाशिकची उलाढाल नाशिकच्या विकासाची पुढील दिशा अधोरेखित करणारी आहे. कुठल्याही शहराचा विकास हा तेथील ग्राहकांच्या खरेदीची क्षमता किती आहे, यावर अवलंबून असतो. यंदाच्या दीपावलीने नाशिककरांच्या तसेच उत्तर महाराष्ट्रातील जनतेची खरेदीची मर्यादा बाजारपेठेला दाखवून दिली आहे.

आरोग्यकडेही द्यावे तेवढेच लक्ष

कोरोनामुळे दोन वर्षे नागरिकांना कोंडमारा सहन करावा लागला. परंतु यंदाची दिवाळी मुक्त वातावरणात झाल्याने जनता देखील तेवढ्याच उत्साहाने सणाला सामोरी गेली. लोकांची खरेदीची क्षमता वाढली, हे या निमित्ताने स्पष्ट झाले. परंतु जेवढी उत्साहाने खरेदी झाली तेवढेच आरोग्याच्या समस्यांकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. खरेदीच्या उत्साहात न्हाऊन निघत असताना आरोग्य व शिक्षण या दोन्ही बाबींकडे तेवढ्याच ताकदीने लक्ष दिले गेले पाहिजे. मागच्या पिढीला अशिक्षितपणामुळे किती ठेचा सोसाव्या लागल्या, हे आत्ताच्या पिढीला माहित आहे.

त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व प्रत्येक जण जाणतो. कोरोनाने आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे आता एकूण उत्पन्नापैकी काही प्रमाणात का होईना आरोग्यासाठी खर्च बाजूला ठेवणे गरजेचे आहे. हात धुण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत अशा प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत आहे. थोडक्यात कुटुंबाचे अर्थ नियोजन पुन्हा एकदा नव्याने करण्याकडेही लक्ष पुरवावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT