K C Pandey
K C Pandey esakal
सप्तरंग

या जन्मावर, या जगण्यावरशतदा प्रेम करावे!

सकाळ डिजिटल टीम

लेखक : के. सी. पांडे

कुणी कोणत्या क्षेत्रात कमी-अधिक असू शकेल; पण आपली क्षमता स्वतः ओळखून त्या त्या क्षेत्रात सर्वोच्च होण्यासाठी प्रयत्न करून यश शिखर केले पाहिजे. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांच्या काव्यपंक्तीप्रमाणे या जन्म आणि या जगण्यावर खऱ्या अर्थाने प्रेम केल्यासारखं सिद्ध होईल, असे माझे मत आहे. योग्य संवाद, चांगला आहार, आचार व विचार यांचा अवलंब केला तर आयुष्य सुंदर होईल. (Saptarang Latest Marathi Article by KC Pandey nashik news)

जीवन अतिशय सुंदर आहे. ईश्वराकडून मिळालेली अनमोल भेट म्हणजे हा मानवी देह होय. मानवी देहाला सुंदरपणे जगता आले पाहिजे, तरच जीवनाचे सार्थक होईल. असे म्हटले जाते, की मानवाला अनेक जन्मानंतर मनुष्य हा जन्म मिळाला आहे. आपण हे महत्त्व समजून घेतले पाहिजे. पृथ्वीतलावर लाखो प्रकारची जीव जन्म घेतात, काही वेळाने नष्ट होतात, इतिहास त्यांची दखलही घेत नाही. आपले जीवन यामध्ये दोन सर्वांत महत्त्वाच्या क्रांतिकारी अवस्था आहेत. एक तर आपला जन्म व दुसरे आपण जीवन कसे जगलो.

जे उपलब्ध आहे ते स्वीकारले पाहिजे. मी गारगोटी स्वीकारली आणि समर्पित झालो. कुणी कोणत्या क्षेत्रात कमी-अधिक असू शकेल; पण आपली क्षमता स्वतः ओळखून त्या त्या क्षेत्रात सर्वोच्च होण्यासाठी प्रयत्न करून यश शिखर केले पाहिजे. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांच्या काव्यपंक्तीप्रमाणे या जन्म आणि या जगण्यावर खऱ्या अर्थाने प्रेम केल्यासारखं सिद्ध होईल, असे माझे मत आहे.

जीवन हे अमूल्य आहे. सर्वकाही व्यवस्थित, सर्वांनाच काही मनासारखं मिळत नाही. अधिकाधिकांना संघर्षच करावा लागतो, त्यांनाच यश मिळते. कौटुंबिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक पातळीवर संघर्षाचे अनेक प्रकार आपल्याला म्हणता येतील. अनुकूल परिस्थिती असण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीचाच जीवनात अधिक सामना करावा लागतो. माझेही बालपण व्यवस्थित असताना वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचे निधन झाले. आईने योग्यरीत्या सांभाळले, मला घडविले. याचाच अर्थ सगळं काही मनासारखं झालं नाही. वडिलांचे प्रेम मिळाले नाही, तरी यातून मी मार्ग काढला. प्रत्येक परिस्थितीतून सामान्य स्वीकारावं. संघर्षाशिवाय जीवन सुंदर होऊ शकत नाही, असे माझे ठाम मत आहे.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

पृथ्वीतलावरील मोजके जीव जगण्यासाठी संघर्ष करतात. स्वतःच्या कर्तृत्वाने संघर्षाने इतिहासाला काळाला त्याची दखल घ्यायला लावतात. याप्रमाणेच पृथ्वीवर मानवीरूप देह धारण करणारा मनुष्य जन्माला येतो. स्वतःच्या जगण्यासाठी संघर्ष करतो. चांगले कर्म करतो, स्वकर्माने स्वतःची ओळख निर्माण करतो. मीही असेच जगावेगळे क्षेत्र निवडले आणि त्याच्या स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. जीवन जगणे यापेक्षा कसे जगले याला महत्त्व आहे.

मनुष्य जीवन मर्यादित आहे. परंतु आपण आपली आठवण यशस्वी कर्तृत्वाने, चांगल्या कर्माने स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. आयुष्य जगताना जीवन जगताना असं जगा, की काही वेळ तुमच्या कर्तृत्वाचा हेवा वाटला पाहिजे. अनेक जन्मानंतर मिळालेला मनुष्य जन्म योग्य पद्धतीने जगता आला पाहिजे. जीवन जगण्यासाठी चांगली कर्तव्य, कर्म करत राहिले तर तुम्हीही आयुष्यात यशस्वी व्हाल, यात मात्र शंका नाही.

जे खऱ्या अर्थाने जीवनावर प्रेम करतात, ते आपलं असामान्य कर्तृत्व सिद्ध करून आपलं व्यक्तिमत्त्व चिरंतन लोकांच्या मनात रुजवितात. अनेक विचारवंतांनी स्वतःचे जीवन जगण्याबरोबरच दुसऱ्यांच्या जीवनात सुद्धा कसे जगायचे हे तत्त्वज्ञान सांगितले. इतिहासाने नोंद घेतली. अशी अनेक व्यक्तिमत्त्व आहेत, की त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये बदल घडविलाच, पण आपल्याबरोबर इतर समाजामध्येही सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. त्यामुळे त्या समाजाचे जीवन सुखकर व निरामय झाले. संत-महात्म्यांनी भक्तीचा मार्ग सांगितला, तपस्वी योगी यांनी ज्ञानशांतीचा मार्ग सांगितला, तर समाजसुधारकांनी शिक्षणाचा मार्ग, विचारवंतांनी सुंदर विचारांचा मार्ग सांगितला.

जीवनात यापैकी कोणत्या मार्गाची निवड केली, त्यानुसार योग्य जीवन जगत राहिले तर मनुष्य जीवनाचे सार्थक होते. भक्ती, ज्ञान, शिक्षण व सुंदर विचार हे जीवन घडविण्यासाठी योग्य मार्ग आहे. या मार्गावर मनुष्य चालत राहिला तर स्वकर्तृत्वाने, स्वकर्माने तो निश्चित स्वतःची ओळख निर्माण केल्याशिवाय राहात नाही. गारगोटी परिवाराने संपूर्ण जगात एक स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. या पृथ्वीवर आपल्या मार्गाचा ज्यांनी अवलंब केला त्याची ओळख इतरांना जगण्यासाठी प्रेरणा म्हणून आहे. आजच्या कलियुगात मनुष्य तर अहंकार, गर्व, स्वार्थ, लोभीपणा, व्यसन, आळस यांसारख्या अनेक गोष्टींनी ग्रासलेला आहे.

तरुण पिढीकडे पालकांनी लक्ष द्यावे

सुंदर आयुष्य जगताना मात्र त्याला लागलेल्या व्याधींचे व्यसन तो स्वतः व्याधींमुळे स्वतःचे आयुष्य खराब करत आहे. अगदी तरुण पिढीसुद्धा अतिशय घातक स्वरूपाचे आयुष्य जगत आहे. आजकाल तरुण पिढी जीवन जगताना डोळ्यांवर अहंकारची पट्टी बांधली दिसते. तो चुकीच्या मार्गाने जीवन जगतो आहे, हे त्याच्या लक्षातसुद्धा येत नाही. मलाही अशी आकर्षणे क्षणिक सुखासाठी माझ्या तरुण वयात दिसली. पण मी माझ्या ध्येयापासून कधीही वाट चुकविली नाही. व्यसन, चुकीची संगत यामुळे तरुण पिढी भरकटत चालली आहे. याकडे समाज व पालकांनी लक्ष द्यायला हवे. पण यासाठी अधिक विधायक प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपली मुले आधुनिक जगाच्या स्पर्धेत किती वाहवली जात आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. मात्र त्याचवेळी या गोष्टीकडे लक्ष दिले तर त्यांचे जीवन बरबाद व्हायला वेळ लागणार नाही.

आपल्याला जे जीवन मिळाले आहे, या जीवनाची अनुभूतीसुद्धा होते. परंतु अशा फारच कमी लोक आहेत, की हे जीवन संवेदनशीलतेने ग्रहण करतात. साधारणपणे मनुष्य एक समतल स्तरावरील जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असतो. मनुष्य देह हा आपल्याला कशासाठी मिळाला आहे? हा जन्म आपल्याला का बरं प्राप्त झाला आहे? या जीवनाचे अंतिम ध्येय काय? मनुष्य जीवनाची अंतिम सफलता कशात दडली आहे? वास्तविक पाहता हे आपणास कधीही विसरून चालणार नाही, हे प्रश्न ज्याला पडतात तोच याची उत्तरे शोधतो व प्रत्यक्षात आणतो. आपल्याबरोबरच इतरांचेही जीवनात क्रांती घडवितो.

योग्य संवाद, चांगला आहार, आचार व विचार यांचा अवलंब केला तर आयुष्य सुंदर होईल. म्हणून मनुष्य म्हणून जगताना आनंद व सुखप्राप्त होईल. येणारा काळ आपल्या जगण्याची निश्चितच दखल घेईल. जीवन असे जगावे, की किमान आपल्या सहवासातील समाजाने आपली दखल घेतली पाहिजे. आपला आदर्श निर्माण केला पाहिजे. आज समाजामध्ये वावरताना मला जो मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळाली, याचे श्रेय माझ्या आयुष्यातील सर्व सहकाऱ्यांना व कुटुंबांना आहेच, पण मी माझ्या ध्येयापासून भरकटलो नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या जगण्यानेच लोकांना प्रेरणा मिळावी, तरच मनुष्य जन्माला येऊन फायदा झाला आहे, असे म्हणता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT