hobby
hobby esakal
सप्तरंग

आयुष्य जगायला शिकवणारे 'छंद'!

सकाळ डिजिटल टीम

आज काल प्रत्येक जण स्वप्रगतीच्या आणि पैशाच्या भौतिक सुखाच्यामागे धावत धावत कधीच समाधानी न राहता तो त्याचा आनंद ही हरवून बसला आहे. ज्यामुळे मानसिक तणावामुळे मानसिक आरोग्यही हरवून बसला आहे. यामुळेच सहन न झाल्याने अगदी नकारात्मक विचाराने आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचला आहे. हल्ली डिजिटलायझेशन च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अगदी बालपणापासूनच मुले मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सच्या अधीन जाऊन त्यांचे व्यसन बनले आहे, ते न मिळताच टोकाची भूमिका घेऊन लहान वयातच त्यांच्या मनात आणि कृतीत आत्महत्येचे विचार येत आहेत.

पूर्वी यागोष्टी नसल्याने शाळेत किंवा पालक मुलांना शारीरिक, मैदानी खेळ शिकवीत ज्यामुळे त्यांची शारीरिक क्षमताही वाढे. याच बरोबर मुले खेळता-खेळता अनेक गोष्टी जशा नाणी, नोटा, पोस्टाचे स्टॅम्प, काडेपेटीच्या छाप, मान्यवरांच्या स्वाक्षरी असे छंद जोपासत होते. त्यातूनच ते खरा बालपणाचा आनंद लुटत असत. त्यात संस्कारातून पुढे मोठेपणीही तो छंद आवड स्वतःही आणि आपल्या भावी पिढीतही रुजवतअसे, तीच खरी काळाची गरज आहे, आज मुलांना व्हिडिओ गेम्स मोबाईल यागोष्टीं पासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना त्यांच्या आवडीच्या कलेकडे, जसे गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला याचबरोबर विविधगोष्टींचा संग्रह करणे याकडे त्यांचेमनवळवले पाहिजे.

छंद म्हणजे नेमक काय?

तर छंद म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडून त्याविषयी रस घेऊन ते जोपासणे म्हणजे छंद. कारण यातूनच आपणास एकवेगळा आनंदमिळतो, एक सकारात्मक समाधान मिळते. इतकेच नव्हे तर छंदातून अनेक फायदे आपणास होऊ शकतात. दैनंदिन आयुष्य जगत असताना किमान एक तरी छंद जोपासावा. तुमचा छंद तुम्‍ही जिवंत असल्‍याची अथवा तुम्‍हाला जगण्याची प्रेरणा देत असतो. छंद नसलेली व्‍यक्‍ती कायम रुक्ष आयुष्य जगत असते. तर छंद जोपासणारे आयुष्याचा खरा आनंद घेत असतात.

इतकेच नव्‍हे, तर छंद जोपासणाऱ्या व्‍यक्‍तींचा मेंदू इतरांच्‍या तुलनेत तल्‍लख, प्रफुल्‍लित आणि ताजातवाना राहतो हे विज्ञानाने सिद्ध केलंय. त्‍यामुळे स्‍वतःला काय हवं आहे, स्‍वतःचा आनंद कशात आहे हे जाणून घ्यायला हवे. छंद आपल्या आयुष्यात अनमोल आनंद देऊ शकतात. छोट्या-छोट्या छंदांतून आपण आयुष्य समृद्ध करू शकतो,आनंद मिळण्यासाठी व्यक्ती स्वतःची आवड, हौस किंवा विरंगुळा जोपासते त्‍याला छंद म्‍हणणे अधिक योग्‍य ठरेल. तरुण असो- वा वयोवृद्ध प्रत्येकाने एक तरी छंद जोपासावा; कारण त्यातूनच आपली ओळख निर्माण होते, खरंखुरं समाधान मिळतं. छंद जोपासणारे आयुष्यात कमी वेळेत अधिक परिपक्‍व होतात. समाज, कार्यालय अथवा व्‍यवसायाच्‍या ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येतो. अप्रत्‍यक्षपणे तुम्‍हाला एक नवी उंची देण्यासाठी तुमचे छंद उपयोगी पडतात. छंदा मुळे तुम्‍हाला आयुष्यात वेगवेगळ्या परिस्थितीशी सामनाकरण्याची शक्‍ती मिळते.

त्‍या शिवाय नवी आव्‍हाने स्‍वीकारून ती पूर्णत्वास नेण्याकरिता दिशाही मिळत जाते. छंद हे एकप्रकारे आयुष्याचे व्‍हॅल्‍यू- ॲडिशन असतात. त्‍यामुळे एक तरी छंद जोपासावा अन्‌ त्‍या तून स्‍वतःचा शोध घ्यावा. छंद हे आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवितात आणि आपण छंदातून मानसिक समाधान मिळवतो असे ते म्हणतात. प्रसंगी हा छंद एखाद्या असाध्य रोगावर मात करून जीवन जगण्याची उभारी देतो. आयुष्यातील समस्यांना आणि कटकटींना कंटाळून जीवनाला विटलेले अनेक जण केवळ छंदामुळे आपले आयुष्य सुखी आणि समाधानाने जगल्याची अनेक उदाहरणे देता येतील.

जसे आपणास एखादी गोष्ट लहानपणापासूनच आवडू लागली तर ती आयुष्यभर आपल्या मनात घर करून राहते. मग ती पुढे-पुढे अजून फुलविण्याचा आपण प्रयत्न करतो, म्हणजेच याचा अभ्यासकरून त्यात संशोधन करून नवीन शोध लावू शकतो. उदा. पोस्टाच्या संग्रहातून त्यांचा इतिहास त्या देशाची भौगोलिक परिस्थितीची माहिती होते, आपण पण पाहतो अनेक देश-विदेशात आणि भारतातही अनेक शहरांमध्ये मोठे संग्रहालय उभारली आहेत त्यामुळे त्या संग्रहालयाला भेट दिल्यावर त्याठिकाणची ऐतिहासिक माहिती, प्राचीनकाळातील राजेसैनिकांनी वापरलेल्या वस्तू जसे सोन्या चांदीची भांडी, त्यांचीवस्त्रे, युद्धात लढाईत वापरलेली शस्त्रे ढाल- तलवारदांडपट्टा वाघनखी इत्यादी अनेक गोष्टी नवीन पिढीला माहीत होतात. त्यामुळे यांच्या प्रती अभिमान जागृत होतो. ज्ञानातही भरपडते, ज्या-ज्या शहरातील प्राचीन पुरातन वास्तू मध्ये लोक त्याठिकाणी भेट देतात, यातून पर्यटनला तर चालना मिळतेच याचबरोबर आर्थिक प्रगतीलाही चालना मिळते.

अनेक लोक एखाद्या गोष्टींवर प्रबंध लिहिताना संग्रहालयाच्या प्राचीन गोष्टींच्या अभ्यास करून नवीन शोध लावतात. याछंदामुळे शोधकवृत्ती निर्माण होऊन मुले मोठेपणी संशोधकही बनू शकतात, छंदामुळे मुले नकारात्मक विचार, विध्वंसक कृत्य या पासून दूर राहून त्यांच्या मध्ये संशोधनवृत्ती, सकारात्मकविचार, नाविन्यकलाकृती, पर्यटनाची पर्यायाने अभ्यासूवृत्ती निर्माण होते, नवीन काही तरी करण्याची उमेद जागृत होते, यासाठीच आताच्या मुलांना छंदाची आवड निर्माण व्हावी म्हणून मी छंदोमयी साकारले आहे. यात महाराष्ट्रातील अनेक शहरातील विविध छंद असणारे व्यक्ती जोडले गेले आहे यात वेगवेगळ्या छंदा बद्दल जसे स्वाक्षरी, दुर्मिळ नाणी नोटा,स्टॅम्प यांच्या संग्रहातून त्याची माहितीपूर्ण अभ्यास, शंख-शिंपले, दगड संग्रहातून त्याठिकाणच्या भौगोलिकस्थितीची माहिती, कापूसशिल्प, खडू पेन्सिलवरील शिल्प यातून नवीन शिल्प बनविण्याचा ध्यास, क्रिकेटसाहित्यावर क्रिकेटर यांच्या स्वाक्षरी घेऊन काही तरी जगावेगळं करून क्रिकेटवीरांच्या आठवणी जतन करणे, समाजातील मान्यवरांची पत्रमैत्री करून त्यांचे विचार संग्रहित करणे, विविध देशविदेशातील वस्तूंचासंग्रह,न पाहिलेल्या-वाचलेल्या वृत्तपत्रांचा संग्रह, जगभरातील विविधप्रकारचे बुद्धिबळपट, खोडरबर, पेन्सिल, विमानाच्या तिकिटांसह विमानातील वस्तूंचा संग्रह असे अनेक संग्रह करणारे संग्राहक यात आपले संग्रह नित्य-नियमाने स्वतः आनंद घेऊन तो इतरांना दाखवून इतरांनाही आनंद देत आहेत.

पु. ल. देशपांडे म्हणतात,

‘आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटा-पाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्या वरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी छंदाशी- कलेशी मैत्री जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी- छंदाशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.’

- प्रसाद सुलभा साहेबराव देशपांडे, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; महाराष्ट्रातील 14 गावांचं तेलंगणामध्ये मतदान

महिला लैंगिक शोषण प्रकरण : 'माजी पंतप्रधानांच्या नातवाला आणण्यासाठी SIT परदेशात जाणार नाही'; गृहमंत्र्यांची माहिती

IPL 2024 : 'त्या' रात्री फक्त 3 ते 4 खेळाडूंनी जेवण..., KKR प्ले-ऑफमध्ये पोहोचल्यानंतर उलगडले ड्रेसिंग रूममधील रहस्य

Share Market Today: आज शेअर बाजारात खरेदी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Latest Marathi News Live Update : प्रज्वलला आणण्यासाठी एसआयटी परदेशात जाणार नाही - गृहमंत्री परमेश्वर

SCROLL FOR NEXT