Datta-Dhamankar
Datta-Dhamankar 
सप्तरंग

‘त्यानिमित्तानं बाबांची तरी सुटेल!’ (दत्ता धामणस्कर)

दत्ता धामणस्कर,निगडी प्राधिकरण (पुणे)

आज माझ्या सत्तरीच्या टप्प्यावर मी जेव्हा आयुष्याकडे वळून पाहतो तेव्हा माझ्या छोट्या मुलीकडून मिळालेल्या प्रेरणेमुळेच मी सामान्य कामगार ते गुणवंत कामगार व प्रशिक्षक अशी मजल गाठू शकलो हे मला जाणवतं. 

सन १९८१ मध्ये मी फॉरमायका कंपनीत कामगार संघटनेचा नेता होतो. व्यसनाधीनता व कर्जबाजारीपणा यामुळे कंपनी १८ कामगारांना कामावरून काढून टाकणार होती. मात्र, संघटनेनं पुढाकार घेत ‘या कामगारांना आम्ही व्यसनमुक्त करून दाखवू, त्यांना एकदा तरी संधी द्या’ असा प्रस्ताव मांडला व व्यवस्थापनानं व संघटनेनं माझ्यावर या कामगारांच्या समुपदेशनची जबाबदारी सोपवली. 

‘सर्व श्रमिक संघटने’चे कॉम्रेड (कै) अप्पासाहेब भोसले व (कै) अशोक मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार होतो. 

मी या सन्मानानं भारावून गेलो व माझ्यावरच्या या नव्या जबाबदारीविषयी घरी पत्नीला सांगितलं. त्यावर ती माझ्यावर खूप चिडली. ‘त्या कामगारांमध्ये सुधारणा होणारच नाही. तुम्ही ही जबाबदारी स्वीकारून मोठी चूक केली आहे व त्यामुळे तुमचीही नोकरी धोक्‍यात येऊ शकते’ असं मत पत्नीनं मांडलं व आमच्यात जोराचा वाद सुरू झाला. 

आमची दहा वर्षांची मुलगी निखिला ऊर्फ राणी हे सगळं ऐकत होती. ती पत्नीला म्हणाली : ‘‘आई, बाबांना हे काम करू देत.’’ 

त्यावर आई तिला म्हणाली : ‘‘तू लहान आहेस, तुला काय समजतंय?’’ 
निखिला म्हणाली : ‘‘इतर लोकांची दारू सुटेल किंवा नाही ते मला माहीत नाही; पण आपले बाबा दर रविवारी मोठी बाटली घेऊन बिअर का टिअर पितात, ती तरी त्यांची सुटेल यानिमित्तानं...’’ 

निखिलाचं ते वाक्य ऐकून मी नखशिखान्त हादरलो. 
कारण, पत्नी जेव्हा मला बिअरबद्दल विचारी तेव्हा मी तिला गोड शब्दांत पटवून देत असे :‘अगं, ही दारू नाहीये. हे बार्लीचं पाणी आहे आणि त्यानं तब्येत सुधारते...’ वगैरे. 
असं असलं तरी, आपले बाबा काहीतरी वेगळं पीत असतात,
हे या छोट्या निखिलाला समजलं होतं.  
मी क्षणभर क्रोधित झालो. मुलगी आपली इज्जत काढत आहे असं मला वाटलं! तिच्या श्रीमुखात द्यावी असंही मला वाटून गेलं. निखिलानं माझ्या सदसद्विवेकबुद्धीला साद घातली होती! 
माझ्या आयुष्यातला तो कलाटणीचा क्षण ठरला. जग सुधारण्याची प्रक्रिया स्वतःपासून सुरू करायची असते! 
मी निखिलाला जवळ घेतलं व दाटलेल्या आवाजात तिला सांगितलं : ‘‘आजपासून तुझा बाप व्यसनमुक्त असेल.’’ 
खूप कठीण होतं; पण साध्य झालं. 

दुसऱ्या दिवसापासून कामगारवस्तीत पत्नीसह जाऊन व्यसनमुक्तीचं/ कर्जमुक्तीचं कार्य मी सुरू केलं. १८ पैकी १७ कामगारांच्या नोकऱ्या वाचल्या. सन १९९१ मध्ये राज्य शासनातर्फे गुणवंत कामगार पुरस्कारानं मला सन्मानित करण्यात आलं. रेडिओ/टीव्हीवर मुलाखत झाली. अनेक मान-सन्मान मिळाले. 

कालची ही आमची ‘छोटी उस्ताद’ म्हणजेच आजची निखिला शिरोडकर माझ्याबरोबर अनेक कंपन्यांमधून ‘जीवन विकास कार्यशाळा’ घेत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT