मनमोराचा पिसारा : एकतेचं बाळकडू sakal
सप्तरंग

मनमोराचा पिसारा : एकतेचं बाळकडू

‘भारत माझा देश आहे! सारे भारतीय माझे बांधव आहेत आम्ही सारे भारतीय आहोत!''

सकाळ वृत्तसेवा

आज या धरतीला शांततेची गरज आहे. मूर्तिमंत चिरतारुण्य अन बहरलेल्या उन्मादाचे प्रतीक असलेल्या रमणीय निसर्गाचा आनंद भरभरून लुटण्यासाठी आज वसुंधरा आसुसलेली आहे. तिच्या लेकराबाळांना या जीवनाचा आस्वाद घेता यावा म्हणून ती आतल्या आत तडफडत आहे. परंतु कृतघ्न मनुष्याला आज याची जाणीव नाही. तो जीवनाची सारी मूल्ये गिळंकृत करू पाहणाऱ्या विनाशाच्या खाईकडे डोळे झाकून चालला आहे. क्षणिक मोहापायी, सुखापायी तो आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून घेत आहे.

‘भारत माझा देश आहे! सारे भारतीय माझे बांधव आहेत आम्ही सारे भारतीय आहोत!'' प्रत्येकाच्या मुखातून गर्जणाऱ्या या प्रतिज्ञेचा शब्दनशब्द खऱ्या भारतीयांचा अणुरेणू स्फुल्लिंग प्रमाणे चेतावितो, त्याच्या नसानसातून खळखळणाऱ्या सार्थ अभिमानाला जागवितो आणि पुन्हा तेच दशदिशांना सांगतो आम्ही सारे..!’

ज्यावेळी संकुचित वृत्तीने मनुष्याला आपल्या करपाशात आवळले नव्हते, भ्रष्टाचाराचा भस्मासुर त्याच्या नैतिकतेचे भस्म करीत नव्हता, लाचलूचपतींचा सुळसुळाट झाला नव्हता, त्यावेळी ''सुजलाम सुफलाम'' सुमनाच्या भारतात पवित्र सरिता सागराला आवेगाने आलिंगन देत होती, उत्तुंग हिमालय भारतीयांची उज्ज्वल गाथा मस्तक उंचावून गात होता, वनश्री भारतीयांच्या एकतेच्या स्तुतीस्त्रोताची बासरी वाजवत होती. तिथे ना षड्रिपुचा स्पर्श होता ना भांडण, तंटे !'' आनंदाचे डोही ...''अशा आनंद सागरात डुंबणारा प्रत्येक भारतीय दुसऱ्यामध्ये स्वतःची छबी निरखत होता,त्याच्या सुख दुःखाशी समरस होत होता. तिथे ना भांडण, तंटे !''आनंदाचे डोही ....''अशा आनंदसागरात डुंबणारा प्रत्येक भारतीय अभिमानाने म्हणत होता ''आम्ही सारे भारतीय आहोत.''

परंतु नंतर भ्रष्टाचाराचा भस्मासूर त्याला गिळंकृत करू लागला, हिमालय अबोल बनला, भारतीयांच्या एकतेची स्तोत्रे गाणाऱ्या वनश्री च्या बासरीतून सात वेगवेगळे सूर निघू लागले. माणूस माणसाला विसरू लागला, उरला फक्त कानून! जातीय दंगे , भाषा भेद, दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, वशिलेबाजी यांच्या खाईत लोटलेल्या भारतीयांना आपल्या स्वत्वाचा, भारतीयत्वाचा विसर पडला. अन मग प्रत्येक जण म्हणू लागला -''आम्ही सारे भारतीय शीख, ''आम्ही सारे आसामी '',‘आम्ही सारे’...

स्वतःची एकजूट कायम राखू न शकणाऱ्या भारतीयाला खरा उज्ज्वल भविष्यकाळ मग पहायला मिळणार की नाही? जर हे नैसर्गिक आणि मानसिक प्रदूषण थांबवलं, नैतिकतेच्या असीम मूल्यांचं जतन केले, श्रद्धा, भक्ती, प्रेम आदर या भावनांना मनात स्थान दिलं, मनातील किल्मिषं धुऊन टाकलं तर भारत देश एकसंघ बनू शकेल. तेव्हाच हा भरतवृक्ष उज्ज्वल भविष्याच्या सोनेरी फळांनी बहरेल. एकतेचं बाळकडू पिऊन प्रत्येकजण गर्जेल ‘आम्ही सारे भारतीय होतो!, आम्ही सारे भारतीय आहोत!, आम्ही सारे भारतीय राहू!

शुभांगी पोहरे, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: राज्याचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे फक्त परळी, गंगाखेडमध्येच का? सोळंकेंनी व्यक्त केली होती नाराजी

IndiGo Flights Cancelled : मोठी बातमी! ‘इंडिगो’ची जवळपास २०० उड्डाणं रद्द; देशभरातील प्रवाशांना मनस्ताप!

Pune Drunk And Drive Case : मद्यधुंद वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी; व्हॅले पार्किंग करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला चिरडल्याचे प्रकरण!

Tatkal Ticket Booking: रेल्वेच्या तात्काळ तिकीटासाठी नवा नियम! 'व्हेरिफिकेशन'शिवाय बुकिंग होणार नाही

IND vs SA, ODI मालिका सुरू असतानाच भारताच्या क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा; वर्ल्डपही खेळला, तर CSK चेही केलं प्रतिनिधित्व

SCROLL FOR NEXT