Indigenous Chickens esakal
सातारा

New Year 2024 : नववर्षाच्या स्‍वागतासाठी शिवारातील मेजवानीला पसंती; गावरान कोंबड्यांच्‍या मागणीत मोठी वाढ

नववर्षाच्या (New Year 2024) स्वागतासाठी खवय्यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

जयंत पाटील

गावरान कोंबडी आणि संकरित जातीच्या कोंबड्यांचा सर्वसाधारणपणे वाण एकसारखा असला, तरी चवीत फरक आहे.

कोपर्डे हवेली : ग्रामीण भागात शेतीबरोबर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाकडे पाहिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात घरोघरी अर्थार्जनासाठी गावरान (देशी) कोंबड्या पाळल्या जातात. नववर्षाच्या (New Year 2024) स्वागतासाठी खवय्यांची जय्यत तयारी सुरू झाली असून, ठिकठिकाणी मेजवाणीचे बेत आखले जात आहेत.

या नियोजनासाठी गावरान कोंबड्यांना (Chickens) पसंती दिली जात असून, त्‍याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. शहरी भागातील नागरिक नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलला पसंती देतात, तर ग्रामीण भागात शेतवस्ती किंवा शिवारात पार्टी करण्यावर भर दिला जातो.

सध्या गावरान (देशी) कोंबड्यांना मागणी वाढल्यामुळे दर वधारले आहेत. सर्वसाधारणपणे गावरान कोंबडा सातशे रुपये, तर कोंबडी पाचशे रुपयेप्रमाणे विक्री केली जात आहे. याच गोष्टीचा व्यापारी फायदा उचलत असून, देशी कोंबड्यांच्या नावाखाली संकरित जातीच्या कोंबड्यांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. संकरित आणि देशी कोंबड्यांच्या चवीत फरक असल्यामुळे खवय्यांची पहिली पसंती ग्रामीण भागातील देशी कोंबड्यांनाच आहे.

गावरान कोंबड्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून संकरित जातीच्या कोंबड्यांची विक्री होत आहे. त्यामुळे आम्ही घरगुती कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोंबडे खरेदी करतो. चवीबाबतीत इतर मांस, बॉयलर, संकरितच्या तुलनेत गावरान सरस आहे. त्‍यामुळे मेजवानीचा बेत आखला, की आम्ही पहिली पसंती गावरानलाच देतो.

-अजित चव्हाण, गावरान चिकनप्रेमी, कोपर्डे हवेली.

वाण एकसारखा चवीत मात्र फरक

गावरान कोंबडी आणि संकरित जातीच्या कोंबड्यांचा सर्वसाधारणपणे वाण एकसारखा असला, तरी चवीत फरक आहे. त्‍यामुळे जातिवंत देशी कोंबड्यांनाच ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. अशा कोंबड्या खरेदी करताना त्‍या शेतकऱ्यांकडूनच घेण्यावर जास्त भर असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! 'या' लाडक्या बहिणींवर होणार कारवाई, मंत्री आदिती तटकरेंचा थेट इशारा..

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Shirur Police Crackdown: शिरूर पोलिसांची गावठी व बेकायदा दारूविक्रीवर धडक कारवाई; हातभट्ट्या उध्वस्त

Latest Marathi News Live Update : काँग्रेस नक्षलवाद्यांना हुतात्मे संबोधते आणि त्यांच्यासाठी अश्रू ढाळते - भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला

नवरा वकील, सासू माजी न्यायाधीश ! तरीही केला हुंडयासाठी छळ; त्विशा शर्माने मैत्रिणीला केलेला मेसेज चर्चेत

SCROLL FOR NEXT