Gondawale Sakal
सातारा

गोंदवलेत 75 वर्षांची नाट्य महोत्सव परंपरा यंदाही खंडित

कोरोनाच्या दुसऱ्या भागाचा उत्तरार्ध सुरू असतानाच अद्यापही भीती कायम आहे. परिणामी गोंदवले खुर्दमध्ये यंदाही गोकुळाष्टमीच्या शोची घंटा वाजणार नसल्याने नाट्यप्रेमींची निराशा झाली.

फिरोज तांबोळी

गोंदवले (सातारा) - कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या भागाचा उत्तरार्ध सुरू असतानाच अद्यापही भीती कायम आहे. परिणामी गोंदवले खुर्दमध्ये (Gondawale Khurd) यंदाही गोकुळाष्टमीच्या शोची घंटा वाजणार नसल्याने नाट्यप्रेमींची (Drama) निराशा झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सुमारे ७५ वर्षांची नाट्य महोत्सव परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली आहे.

गोंदवले खुर्दमध्ये समाजप्रबोधनासाठी मनोरंजनातून प्रयत्न झाले. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात हणमंत कुलकर्णी मास्तरांनी गावातील आकाराम कदम, दादा शेडगे, सीताराम कुलकर्णी, महालिंग खांडेकर, शंकरराव काळे, रामचंद्र पोळ आदींच्या सहकार्याने नाट्य महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. काही काळ बंद पडलेला हा महोत्सव कृष्णराव पोळ, अशोक पोळ, काशिनाथ चव्हाण, काशिनाथ जाधव यांनी १९७४ मध्ये पुन्हा सुरू केला.

याच दरम्यान कामगारांनी पुकारलेल्या बंदमुळे मुंबईतील कामगार गावी आले आणि नाट्य कलेच्या उपक्रमाला मूर्त रूप मिळाले. महादेव घाडगे यांच्या पुढाकाराने १९७७ मध्ये सन्मित्र नाट्य संस्थेची कायदेशीर नोंदणी झाली अन् अर्जुनराव शेडगे, साहेबराव शेडगे, मधुकर गुरव, रमेश खांडेकर, विजय चव्हाण, विजय ढालपे, आनंदराव पोळ, रामभाऊ पोळ यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागात पहिल्यांदाच राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा सुरू झाल्या.

गोकुळाष्टमीनिमित्त दर वर्षी गावात सुरू झालेली नाट्य स्पर्धेची परंपरा नाट्यप्रेमी व ग्रामस्थांनी कायम राखली आहे. मात्र, कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून ही परंपरा खंडित झाली आहे. गेल्या ७० दशकांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेला खंड पडल्याने कालाकारांसह नाट्यप्रेमी, प्रेक्षक व ग्रामस्थांचीही निराशा झाली आहे.

गोकुळाष्टमी सप्ताहात मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रम साजरे होतातच. शिवाय गावात विविध स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन, दहीहंडी स्पर्धा असे विविध उपक्रमही राबविण्यात येतात. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा हे या महोत्सवातील मुख्य आकर्षण असते. यामध्ये सर्व गावकरी हिरिरीने सहभागी होत असल्याने एकोप्याची भावना वाढीस चालना मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र हे सर्वच कार्यक्रम यंदाही रद्द झाले आहेत.

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी नाट्य स्पर्धेची परंपरा खंडित झाल्याने सर्वांचेच मन नाराज झाले असले, तरी आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने पुन्हा जोमाने गोकुळाष्टमी साजरी करू.

- विजयसिंह चव्हाण, नाट्यकर्मी, गोंदवले खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 3rd T20I : भारताने केला विक्रमी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग, ऑस्टेलियाला नमवून मालिका बरोबरीत; अर्शदीप, सुंदर ठरले लकी

Madhuri Elephant News : तब्बल ३ महिन्यांनी माधुरी हत्तीणीने वनतारात गेलेल्या माहुत इस्माईल चाचाला बघताच काय केलं, माधुरीबाबत लवकरच गूड न्यूज...

इतक्या स्वस्तात Iphone 16 खरेदी करण्याची संधी परत मिळणार नाही, अ‍ॅमेझॉनवर सुरु आहे जबरदस्त ऑफर...

Solapur Marathon: सोलापूरकर धावले अन्‌ जिंकले! होम मैदानावर पहाटेपासूनच हजारो धावपटू अन्‌ आरोग्यप्रेमी नागरिकांची भरली जत्रा

Women's World Cup 2025 Final: दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध जिंकला टॉस; पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याला सुरुवात होणार...; पाहा प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT