Accident sakal
सातारा

सातारा :फत्‍यापूरच्या युवकाचा अपघाती मृत्‍यू; आठ जण जखमी

मुंबई- गोवा महामार्गावर चारचाकी वाहनाच्या झालेल्‍या अपघातात पंकज भगवान घाडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गिरीश चव्हाण

सातारा : मुंबई- गोवा महामार्गावर रविवारी सायंकाळच्या सुमारास कशेडी (ता. खेड, जि. रत्‍नागिरी) येथे चारचाकी वाहनाच्या झालेल्‍या अपघातात फत्यापूर (ता. सातारा) येथील पंकज भगवान घाडगे (वय ३९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले असून, मृत आणि जखमी रत्‍नागिरी येथे फिरण्‍यासाठी निघाले होते.

फत्यापूर येथील आठ ते दहा तरुण दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे फिरण्‍यासाठी चारचाकीतून गेले होते. याठिकाणी फिरल्‍यानंतर ते काल गावाकडे परतत होते. परतीचा प्रवासादरम्‍यान त्‍यांची चारचाकी खेड तालुक्‍यातील कशेडी टॅबच्‍या हद्दीतील खवटी या गावाजवळ आली. त्या वेळी चारचाकी दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. या अपघातात चारचाकीत असणारा पंकज घाडगे आणि त्‍याचे मित्र जखमी झाले. अपघात झाल्‍याचे समजताच स्‍थानिकांनी, तसेच पोलिसांनी तिकडे धाव घेत मदतकार्य सुरू करत जखमींना खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी झालेल्‍या वैद्यकीय तपासणीअंती पंकज घाडगे यांना मृत घोषित करण्‍यात आले.

अपघाताची माहिती मिळाल्‍यानंतर फत्‍यापूर येथील ग्रामस्‍थ, तसेच नातेवाइकांनी तिकडे धाव घेतली. याठिकाणचे शासकीय सोपस्‍कार पार पडल्‍यानंतर पंकज यांचा मृतदेह ताब्‍यात घेत नातेवाईक फत्‍यापूरकडे मार्गस्‍थ झाले. या अपघातात किरण घाडगे (वय ३०), राहुल घाडगे (वय २९), आकाश काळंगे (वय २४), सचिन घाडगे (वय ३२), रोहन शिंदे (वय २६) व इतरांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्‍या असून, त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT