Udayanraje Bhosale esakal
सातारा

'कांटे की टक्कर'! निवडणुकीत दोन्ही राजे एकमेकांविरुध्द भिडणार?

उमेश बांबरे

निवडणूक गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत बिनविरोध होत आलेली होती. पण..

सातारा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (Agricultural Market Committee Election) मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मागील वेळी दोन्ही राजे एकत्र असूनही सोसायटी व ग्रामपंचायत (Gram Panchayat) मतदारसंघात अर्ज मागे घेतले नव्हते. त्यामुळे निवडणूक लागली होती. पण, यावेळेस जिल्हा बॅंक (Satara Bank Election) व सातारा पालिका निवडणुकीच्या (Satara Municipal Election) निमित्ताने दोन्ही राजे आमनेसामने येण्याची शक्यता दिसत असल्याने बाजार समितीच्या निवडणुकीतही दोन राजेंची स्वतंत्र पॅनेल पाहायला मिळाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

सातारा बाजार समितीची निवडणूक गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत बिनविरोध होत आलेली होती. पण, २०१५ च्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याकडे दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे निवडणूक झाली होती. सोसायटीच्या नऊ जागांसाठी ११, तर ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी सहा अर्ज आल्याने निवडणूक झाली होती. सध्या सातारा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कच्ची मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यावर हरकती, सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर किंवा डिसेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे.

सातारा बाजार समितीत संचालकांच्या १६ जागा आहेत. यामध्ये सोसायटी मतदारसंघातील नऊ जागा आहेत. यामध्ये सात पुरुष संचालक व दोन महिला संचालिकांच्या जागा आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार जागा असून, यातील एक जागा दुर्बल घटक व अनुसूचित जाती-जमातीसाठी एक राखीव आहे. तसेच व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून दोन जागा, तर हमाल, मापारी, तोलारी यांच्यासाठी एक जागा आहे. मागील निवडणुकीत सोसायटी गटाचे १७०४ मतदार, ग्रामपंचायतींचे १५०४, व्यापारी प्रतिनिधींचे ९६०, हमाल, मापारी यांचे २१ मतदार अशी एकूण ४२३१ मतदारसंख्या होती. यावेळेस यामध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मतदार यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.

सध्या बाजार समितीत दोन्ही राजेंची एकत्रित सत्ता आहे. पण, यावेळेस जिल्हा बॅंकेमध्ये खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना डावलले जाण्याची शक्यता दिसत आहे. तसेच सातारा पालिका निवडणुकीतही दोन्ही राजेंच्या आघाड्या एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीतही खासदार उदयनराजे गट लक्ष घालणार आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांच्या गटाला ही निवडणूक सोपी राहणार नाही. जिल्हा बॅंकेत खासदार उदयनराजेंना सामावून घेतले गेल्यास बाजार समितीत दोघांची एकत्र सत्ता येण्यास अडचण असणार नाही, अन्यथा दोन्ही राजेंचे बाजार समितीत स्वतंत्र पॅनेल पडणार, हे निश्चित आहे.

संचालकांच्या 16 जागा

सातारा बाजार समितीत संचालकांच्या १६ जागा आहेत. यामध्ये सोसायटी मतदारसंघातील नऊ जागा आहेत. यामध्ये सात पुरुष संचालक व दोन महिला संचालिकांच्या जागा आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार जागा असून, यातील एक जागा दुर्बल घटक व अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. तसेच व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून दोन जागा तर हमाल, मापारी, तोलारी यांच्यासाठी एक जागा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात निवडायला हवं! दिग्गज खेळाडूची मागणी; म्हणाले, तो मॅच्युअर नाही असं...

Pune News : पुणे शहराला विषाणूजन्य आजारांचा विळखा; ‘एच १ एन १’ सह ‘एच ३ एन २’ च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ

Deglur Rain : देगलूरात ढगफुटीसदृश्य पाण्याने हाहाकार; अनेक गावे जलमय शेती ही पाण्याखाली, २५ गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Live Updates : सांताक्रूझमधील अकोला पोलीस स्टेशन परिसरात साचलं पाणी

CP Radhakrishnan Meet PM Modi: ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT