Wine Selling Sakal
सातारा

वाईन विक्रीच्‍या धोरणास ‘अंनिस’चा विरोध

महसूल वाढीसाठी किराणा मालाच्‍या दुकानांत वाईनविक्री करण्‍यास परवानगी देण्‍याचा निर्णय राज्‍य शासन घेणार असल्‍याची चर्चा सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

महसूल वाढीसाठी किराणा मालाच्‍या दुकानांत वाईनविक्री करण्‍यास परवानगी देण्‍याचा निर्णय राज्‍य शासन घेणार असल्‍याची चर्चा सुरू आहे.

सातारा - महसूल वाढीसाठी किराणा मालाच्‍या दुकानांत वाईनविक्री (Wine Selling) करण्‍यास परवानगी (Permission) देण्‍याचा निर्णय राज्‍य शासन (Government) घेणार असल्‍याची चर्चा सुरू आहे. सरकार असा निर्णय घेणार असेल तर त्‍यामुळे सामाजिक शांतता धोक्‍यात येऊन तरुण पिढीचे नुकसान (Loss) होणार असल्‍याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्‍या (Superstition Elimination Committee) वतीने जिल्‍हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्‍यात आले. या निवेदनात विचाराधीन निर्णय मागे घेण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

‘अंनिस’च्‍या सातारा शाखा आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेच्‍या वतीने हे निवेदन देण्‍यात आले. त्यावेळी डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, वंदना माने, अॅड. हौसेराव धुमाळ, उदय चव्हाण, रूपाली भोसले, योगिनी मगर, कुमार मंडपे, डॉ. दीपक माने, विजय पवार, भगवान रणदिवे, प्रमोदिनी मंडपे आदी उपस्थित होते. निवेदनात म्‍हटले आहे की, विविध कारणांमुळे आजची तरुण पिढी व्‍यसनांना जवळ करत आहे.

व्‍यसनाधीन तरुणाईला त्‍यातून बाहेर काढण्‍याचे काम अंनिस आणि परिवर्तन व्‍यसनमुक्‍ती संस्‍था करत आहे. त्‍यातच शासनाने किराणा तसेच रेशन दुकानात वाईन विक्रीस परवानगी देण्‍याचा निर्णय घेतल्‍याची चर्चा आहे. त्यामुळे तरुणाईत व्‍यसनाधिनता वाढीस लागण्याचा धोका आहे. विशेषत: महिला वर्ग त्‍याकडे जास्‍त आकर्षित होण्‍याची शक्यता आहे. या निवेदनात संभाव्य धोरणाचा पुनर्विचार करणे आवश्‍‍यक असल्‍याचे मतही व्‍यक्‍त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT