Satara Municipality
Satara Municipality  sakal
सातारा

Satara Municipality : विकासनिधीची विभागणी चार दिशांत

सकाळ वृत्तसेवा

सातारा - शहरासह विस्‍तारित भागातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्‍यासाठी आवश्‍‍यक निधी मिळण्याचा प्रस्‍ताव सातारा पालिकेने शासनास सादर केला होता. त्यानुसार उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी ४८ कोटींचा विकासनिधी देण्‍याच्‍या सूचना केल्‍या होत्‍या. त्यातील पहिल्‍या टप्‍प्‍यात २५ कोटी पालिकेकडे जमा झाले असून उर्वरित २३ कोटी महिनाअखेरीस जमा होणार आहेत. या निधीची विभागणी चार दिशांनुसार करताना शाहूपुरी, त्रिशंकू भाग, विलासपूर व मूळ शहरात विकासकामे केली जाणार आहेत.

सातारा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत डिसेंबरमध्‍ये संपल्‍यानंतर पालिकेचे प्रशासक म्हणून मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे कारभार गेला आहे. पदाधिकाऱ्यांची मुदत संपण्‍यापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्‍या पदाधिकाऱ्यांना शहरासह हद्दवाढीनंतर पालिकेत समाविष्ट झालेल्या शाहूपुरी, विलासपूर, शाहूनगर, पिरवाडी तसेच इतर त्रिशंकू भागातील नागरिकांना आवश्‍‍यक सोयी-सुविधा पुरविण्‍यासाठीचा विकास आराखडा तयार करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. त्यानुसार तयार केलेला ५१ कोटींचा आराखडा उदयनराजेंनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे सादर केला होता. त्या प्रस्‍तावानुसार निधीबाबतची कार्यवाही सुरू असतानाच उदयनराजेंनी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याशी संपर्क साधत निधीबाबत चर्चा केली. चर्चेअंती अजित पवार यांनी सातारा पालिकेच्या आराखड्यानुसार निधी देण्‍याच्‍या सूचना संबंधित विभागास दिल्‍या.

शासनाकडे सादर केलेल्‍या ५१ कोटींच्‍या आराखड्यानुसार ४८ कोटी देण्‍याचा निर्णय शासनपातळीवर झाला. त्यापैकी २५ कोटींचा पहिला टप्पा पालिकेकडे जमा झाला. उर्वरित २३ कोटी मे महिन्‍याच्‍या अखेरीस जमा होतील. उपलब्‍ध निधीतून सर्वच भागातील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी उदयनराजेंनी उपलब्‍ध आणि येणाऱ्या निधीची शहराच्‍या चारही दिशांत विभागणी करण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत. त्यानुसार शाहूपुरी ग्रामपंचायत व परिसरासाठी १२ कोटी, त्रिशंकू भागासाठी १२ कोटी, विलासपूर व परिसरासाठी १२ कोटी तर मुळ शहरातील विकासकामांसाठी १२ कोटी निधी टप्‍प्‍याटप्‍पाने वितरित केला जाणार आहे. निवडणुकीच्‍या तोंडावर आगामी काळात पुन्‍हा एकदा विकासकामांची रेलचेल सातारा शहर व परिसरात झाल्‍याचे नागरिकांना पाहावयास मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT