Udayanraje Bhosale esakal
सातारा

निवडून येताच उदयनराजेंनी गाठला सुरुची बंगला; भावाचे मानले 'आभार'

सकाळ डिजिटल टीम

बॅंकेत बिनविरोध निवड झालेल्या दोन्ही राजेंनी आज (बुधवार) एकमेकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सातारा : जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीसाठीच्‍या (Satara Bank Election 2021) अर्ज माघारी घेण्‍याच्‍या दिवशी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यासह आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडी जाहीर झाल्‍यानंतर उदयनराजेंनी जाहीर केल्‍यानुसार आज शिवेंद्रसिंहराजेंची (MLA Shivendrasinharaje Bhosale) ‘सुरुची’ येथे भेट घेत त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. औपचारिक चर्चेदरम्‍यान शिवेंद्रसिंहराजेंनी ‘शेवटी काय तुम्‍हाला जे करायचे होते ते केलेच’, असे वक्‍तव्‍य उदयनराजेंना उद्देशून केले. याचा प्रतिवाद करताना ‘दहा ठिकाणी निवडणूक लागलीय, आमची झाली ना बास झालं’, असे वक्‍तव्‍य करत उपस्‍थितांमध्‍ये हास्‍य फुलवले.

जिल्‍हा बँकेच्‍या संचालक मंडळात उदयनराजे यांच्‍या समावेशाला राष्‍ट्रवादीसह शिवेंद्रसिंहराजेंचा विरोध होता. याबाबत वरिष्‍ठ स्‍तरावरील प्रत्‍येक बैठकीत कधी तो निर्णय शिवेंद्रसिंहराजेंवर सोपवा, तर कधी शिवेंद्रसिंहराजे तो निर्णय खासदार शरद पवार, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याकडे सोपवा, अशी मागणी होत होती. नावावर एकमताची मोहोर उमटत नसल्‍याने उदयनराजेंनी ‘काहीही झाले तरी मी आहेच’, असे वक्‍तव्‍य करत रान तापविण्‍यास सुरुवात केली होती.

जिल्ह्यातील ज्‍येष्‍ठांच्‍या गाठीभेटी घेत उदयनराजेंनी निवडणुकीचे वातावरण तापवले होते. याचदरम्‍यान त्‍यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेणार असल्‍याचे सांगत ते न भेटल्‍यास त्‍यांना गाठणारच, असे वक्‍तव्‍य केले होते. उदयनराजेंच्‍या या वक्‍तव्‍यामुळे अर्ज माघारीच्‍या वेळी होणाऱ्या हायव्‍होल्‍टेज ड्राम्‍याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेप्रमाणे उदयनराजेंच्‍या विरोधातील उमेदवारांनी अर्ज मागे घेत त्‍यांच्‍या बिनविरोध विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजेही बिनविरोध निवडून आले.

अर्ज माघारीचे सोपस्‍कार पार पडल्‍यानंतर दुपारी उदयनराजे हे शिवेंद्रसिंहराजेंच्‍या ‘सुरुची’ या निवासस्‍थानी गेले. पुष्‍पगुच्‍छ, भेटवस्तू देत उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा सत्‍कार केला. यानंतर त्‍यांनी निवडणुकीबाबत शिवेंद्रसिंहराजेंशी चर्चा केली. यावेळी वेदांतिकाराजे भोसले व इतर प्रमुख उपस्‍थित होते. निवडणुकीविषयी माहिती देतानाच शिवेंद्रसिंहराजेंनी ‘तुम्‍हाला काय पाहिजे ते करायचे, ते केलेच ना’, असे वक्‍तव्‍य केले. यानंतर ‘आमची झाली ना बास झालं!’, असे वक्‍तव्‍य उदयनराजेंनी करत उपस्‍थितांमध्‍ये हास्‍य फुलवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT