सातारा

शेतकऱ्यांना एकरी 40 हजारांची नुकसान भरपाई द्या : डॉ. भारत पाटणकर

उमेश बांबरे

सातारा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकरी 40 हजार रूपये भरपाई तातडीने द्यावी, तसेच आपत्ती येऊच नये म्हणून कायमस्वरूपी उपाय योजना करावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी निवदेनाव्दारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

डॉ. पाटणकर यांनी निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रामध्ये झालेल्या अवकाळी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वच पिकांचे हातातोंडाशी आलेले उत्पादन पाण्यात भिजून वाया गेले आहे. त्यामुळे वर्षभराचे शेतातील कष्ट वाया जाऊन शेतकऱ्यांना तोटा झाला आहे. परिणामी, शेतकरी सध्या पूर्णपणे खचून गेले आहेत. काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने कोणत्याही कागदपत्रांची यादी न मागता तातडीने खावटी अनुदान द्यावे. यासाठी लवकरात लवकर हानी पोचलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन सरसकट एकरी 40 हजार रूपये तर घरामागे 40 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. 

कधी दुष्काळ, कधी पूर तर कधी अवकाळी पाऊस अशी संकटे काही वर्षांनी पुन्हा पुन्हा येऊन सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटीचा भार पडत आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करणे आवश्‍यक आहे. यासाठी समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवून सर्व गावातील सर्व कुटुंबाना जीविकेला आवश्‍यक शेतीचे पाणी द्यावे. तेवढ्या प्रमाणात पाणी तिकडे वळवता येईल.नदी, नाले, ओढे यांच्यावर झालेली अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत. त्याचबरोबर सर्व नैसर्गिक प्रवाहांचे तेवढ्याच खोलींचे व रुंदीचे करावेत. हे कार्य आणीबाणीच्या पातळीवर केले पाहिजे.

शहरामध्ये सुद्धा या पद्धतीनेच कोणाही हितसंबंधितांचा विरोध न जुमानता काम झाले पाहिजे. यासोबतच समुद्र सपाटीजवळच्या खारेपाट क्षेत्रात समुद्राचे पाणी आत येऊन निचरा होण्यासाठी असलेले बंधारे व उघड्या ह्या मोडल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतात पाणी येऊन नुकसान होते. याच्या नुकसान भरपाईविषयी सुद्धा वेगळा विचार करावा.  याची गंभीर नोंद घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा व तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी संतोष गोटल, चैतन्य दळवी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT