Shashikant Shinde-Mahesh Shinde
Shashikant Shinde-Mahesh Shinde esakal
सातारा

राष्ट्रवादी, सेनेच्या आमदारांसाठी प्रतिष्ठेची लढत

राजेंद्र वाघ

आमदार शशिकांत शिंदेंचे राष्ट्रवादीचे 13 उमेदवारांचे पॅनेल रिंगणात आहे.

कोरेगाव : नगरपंचायत निवडणुकीसाठी (Koregaon Nagar Panchayat Election) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या समर्थकांचे राष्ट्रवादी पॅनेल (NCP Panel) व आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) समर्थकांचे कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेल या दोन पॅनेलमध्येच प्रमुख लढत होत असून, या रणधुमाळीत शशिकांत शिंदे यांच्यापुढे सत्ता राखण्याचे, तर महेश शिंदे यांच्यापुढे सत्ता काबीज करण्याचे आव्हान आहे.

नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत १७ जागांसाठी राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या माध्यमातून किशोर बाचल, किरण बर्गे आदींनी जोरदार लढत देत काँग्रेसने आठ जागा मिळवल्या होत्या. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने नऊ जागा मिळवून सत्ता स्थापन करत राजाभाऊ बर्गे यांना नगराध्यक्षपदी संधी देण्यात आली होती. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नगरसेवक आपापल्या पक्षात एकसंध राहिले नाहीत. त्याची प्रचिती विधानसभेच्या निवडणुकीत आली. विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांच्यावर मात करून महेश शिंदे आमदार झाले. दरम्यान, नगरपंचायतीतील सत्ता टिकवण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी केली आणि किरण बर्गे यांच्या गटाच्या रेश्मा कोकरे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली. मात्र, त्यानंतरही नगरपंचायतीतील राजकारण सातत्याने अस्थिरच राहिले.

माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, काँग्रेसचे नगरसेवक महेश बर्गे तसेच सुनील बर्गे, राहुल बर्गे आदींनी आमदार महेश शिंदे यांच्यासोबत काम सुरू केल्याने या नगरसेवकांना विकासकामांच्या माध्यमातून बळ मिळत गेले. परिणामी, महेश शिंदे यांचा शहरात सहभाग वाढला. या पार्श्वभूमीवर त्यांनी नगरपंचायतीची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली. ते शिवसेनेचे आमदार असल्याने पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवण्याची नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या चार व अपक्ष नऊ अशा १३ उमेदवारांचा समावेश असलेले कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेल रिंगणात उतरवले आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, नियोजन मंडळाचे सदस्य राहुल बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, किरण बर्गे, जयवंत पवार आदी सहकार्य करत आहेत.

दुसरीकडे शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादीचे १३ उमेदवारांचे पॅनेल रिंगणात आहे. गेल्यावेळी विरोधात असलेले किशोर बाचल हे यावेळी राष्ट्रवादीच्या पॅनेलसाठी सक्रिय आहेत. त्याशिवाय माजी सभापती संजय झंवर, प्रतिभा बर्गे, प्रभाकर बर्गे, संजय पिसाळ, किशोर बर्गे आदी प्रमुखांचे राष्ट्रवादीच्या पॅनेलला सहकार्य आहे. काँग्रेसने स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला होता; परंतु या पक्षाने तीन प्रभागांमध्येच उमेदवार दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे व महेश शिंदे यांच्या पॅनेलमध्येच प्रमुख लढत होत असून, प्रभाग क्रमांक दोन, तीन, सात, आठ, नऊ, १३, १४, १५, १६ अशा नऊ प्रभागांमध्ये सरळ लढत आहे. प्रभाग क्रमांक एक, ११, १३ या तीन ठिकाणी प्रत्येकी तीन उमेदवार, तर प्रभाग क्रमांक दहामध्ये पाच उमेदवार रिंगणात आहेत. या चार प्रभागांमध्ये होणारी मतविभागणी कोणाच्या फायद्या-तोट्याची असेल, यावर या चारही प्रभागांतील जय-पराजयाचे गणित अवलंबून आहे.

भाजपचे कार्यकर्ते ‘स्लिपिंग मोड’मध्ये

गेल्या वेळी नगरपंचायतीच्या निवडणुकीत पॅनेल उभे केलेल्या भाजपला मतांसाठी झगडावे लागले होते. त्यावेळी महेश शिंदे भाजपच्या पॅनेलसाठी सक्रिय काम करत होते. यावेळी भाजपचे पॅनेल नाही; परंतु ‘स्लिपिंग मोड’मध्ये राहून या पक्षाचे कार्यकर्ते कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलसाठी सक्रिय असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT