Jayakumar Gore esakal
सातारा

जनतेच्या मुळावर उठलेल्या आघाडी सरकारचा अंत जवळ आलाय : आमदार गोरे

सकाळ डिजिटल टीम

फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान देण्यास आम्ही सरकारला भाग पाडलं.

बिजवडी (सातारा) : एमआयडीसीचे सीईओ असताना आपल्या भागात यांनी किती वसाहती आणल्या ते जनतेला एकदा सांगावे. इतक्या पदावर काम करताना भागातील किती जणांना नोकऱ्या लावल्या ते सांगावे. त्यामुळे भ्रष्टाचारी माजी अधिकाऱ्याने माझ्या नादाला लागू नये, अन्यथा या वयात पळता भुई थोडी होईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी दिला.

धामणी येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन आणि भाजप (BJP) जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, अरुण गोरे, शिवाजीराव देशमुख, सोमनाथ भोसले, नितीन दोशी, हरिभाऊ जगदाळे, अतुल जाधव, धनाजी जाधव, ॲड. हांगे, गावोगावचे सरपंच, उपसरपंच, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, ‘‘सर्वच बाबतीत अपयशी ठरलेल्या आणि शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठलेल्या आघाडी सरकारचा अंत दृष्टिक्षेपात आला आहे. भाजपच जनतेच्या समस्या सोडवून सर्वांगीण विकास साधणारा पक्ष आहे. फडणवीस साहेबांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली आम्ही अधिवेशनात संघर्ष करून शेतकऱ्यांची वीजतोडणी थांबवायला आणि शेतकऱ्यांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यास सरकारला भाग पाडले आहे.

गेल्या १२ वर्षांत माण- खटाव मतदारसंघातील (Maan-Khatav Constituency) प्रत्येक गावाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी आणि इथल्या मातीचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी अहोरात्र झटलो आहे. उरमोडीचे पाणी आल्याने मतदारसंघाचा बराच भाग दुष्काळमुक्त झाला आहे. जिहे- कटापूरसाठी वीस मिनिटांच्या भेटीत मोदींकडून ७०० कोटींचा निधी मिळण्याची तरतूद करून घेतली आहे. येणाऱ्या पाच वर्षांनंतर या भागाला दुष्काळी म्हणण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, असे काम मी करणार आहे.’’ तालुक्यातील ३२ पैकी २१ सोसायट्या आमच्या आल्या आहेत. चार दोन ठिकाणी विजय मिळाला म्हणून त्यांचा खुळखुळा नाचवत असल्याची टीकाही त्यांनी केली.

कोरोना काळात पुण्यात लपले

कोरोना काळात आम्ही साडेतीन हजार रुग्णांवर उपचार केले. डॉक्टरही वॉर्डमध्ये जायला कचरत होते. तेव्हा जयकुमार आत जाऊन रुग्णांची विचारपूस करून धीर देत होता. कोट्यवधी खर्चून माझ्या जनतेवर मी उपचार केले. तेव्हा हे महाशय पुण्यात लपून बसले होते. त्यांना उरमोडी आणि जिहे- कटापूर माहीत नाही आणि पाणी कुठे आहे? असे विचारतात. त्यांचा ऊस मी आणलेल्या उरमोडीच्या पाण्यावर भिजतो. आता जिहे- कटापूरचे पाणी आंधळीत आणून ते उचलणार आहे. ग्रॅव्हिटीने ते वंचित ३२ गावांना देणार आहे, असे श्री. गोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT