Jayakumar Gore vs Ramraje Nimbalkar esakal
सातारा

Jaykumar Gore : माणचा आमदार ठरवणारे रामराजे कोण? सवाल करत भाजप आमदाराची शरद पवारांवरही सडकून टीका

कोणाला आमदार करायचे हे माढा लोकसभा आणि माण मतदारसंघातील जनता ठरवेल.

सकाळ डिजिटल टीम

'माण तालुक्याला दुष्काळीच ठेवण्याचे काम शरद पवारसाहेब आणि तत्कालीन कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी केले.'

सातारा : माढा लोकसभेचा (Madha Loksabha Constituency) खासदार कोण आणि माण विधानसभेचा आमदार कोण पाहिजे, हे येथील मतदारराजा ठरवेल. हा निर्णय घेणारे रामराजे कोण? अशी टीका आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केली.

दरम्यान, दुष्काळी माण तालुक्यावर शरद पवारसाहेब आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनीच अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणांच्या पाणी फेरवाटपाचा घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार गोरे बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अविनाश कदम, सुनील काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनी माण मतदारसंघात आम्हाला नको आहेत, त्यांना आम्ही बाजूला ठेवणार, असे वक्तव्य केले होते.

त्यावर आमदार गोरे म्हणाले, ‘‘ते ठरवणारे कोण, आम्ही त्यांच्या छातीवर बसून तीन टर्म आमदार झालो आहोत. कोणाला खासदार करायचे, कोणाला आमदार करायचे हे माढा लोकसभा आणि माण मतदारसंघातील जनता ठरवेल. मैदानात लढताना समोर विरोधक कोण आहे हे ठरवून आम्ही लढत नसतो. कोणीही आमच्या विरोधात असो. आम्ही त्याला अस्मान दाखवतोच. आमच्यासमोर कोणी का असेना. आम्हाला काही फरक पडत नाही.’’

आमदार गोरे म्हणाले, ‘‘जयंत पाटील यांनाही मी काल जे काही बोललो तेच आजही बोलतो आहे. त्यांच्याबाबतीत मी सृजनशील अशीच भाषा वापरली आहे. त्यांनी जे काय केले त्यावरच मी बोललो आहे. आजपर्यंत दुष्काळी माण तालुक्याला दुष्काळीच ठेवण्याचे काम शरद पवारसाहेब आणि तत्कालीन कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी केले आहे.’’ दरम्यान, आमदार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती देत त्यांचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

बावनकुळे उद्या साताऱ्यात..

भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, ‘‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत्या बुधवारी साताऱ्यात येत आहेत. सकाळी दहा वाजता वाई तालुक्यातील बावधन येथे त्यांचे स्वागत होईल. तेथून ते साताऱ्यात कनिष्क मंगल कार्यालयात येतील. तेथे ३०० पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. तेथून यशोदा कॅप्मस येथे भेट देतील.

सातारा शहरात मोती चौक ते जुना मोटर स्टॅण्ड अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये ते जनतेशी संवाद साधतील. तेथून ते कऱ्हाडला रवाना होतील. कऱ्हाडात त्यांचे जंगी स्वागत होईल. कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात कोअर कमिटीची बैठक होईल. त्यानंतर आझाद चौकापासून ते पायी पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT