सातारा

शिवेंद्रसिंहराजेंनी का बरं मानले अजित पवारांचे आभार, वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. श्री. पवार यांनी 10 दिवसांतच हा प्रश्न मार्गी लावून जिल्ह्याची मोठी गैरसोय दूर केली आहे. कोरोना चाचणी सेंटरमुळे रुग्णांवरील उपचाराला गती मिळेल, असे मत शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त करून श्री. पवार यांचे आभार मानले.
सातारकरांनो सावध व्हा; कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे सावट
 
उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर असताना शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती. त्या वेळी सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर सुरू करावे, अशी मागणी केली होती. रुग्णांवर वेळेवर उपचार सुरू होण्यासाठी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षम आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी साताऱ्यातच कोरोना चाचणी सेंटर असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्या वेळीच मंत्री पवार यांनी याबाबत त्वरित निर्णय घेऊ, असा शब्द दिला होता. त्यानंतर दहाच दिवसांत मंत्री पवार यांनी कोरोना चाचणी सेंटरला मंजुरी दिली.
राजमातांचे वकीलपत्र मागे घे, अन्यथा संपवू : दाेघांची धमकी 
 
शासनाने साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्याचा निर्णय मंजूर केला आहे. कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास 75 लाख 46 हजार 186 इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामग्री इ टेंडरऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांच्याकडील 18 एप्रिलच्या आदेशानुसार पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

प्रांताधिकारी म्हणाले, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार निर्णय घेऊ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; RBI च्या रेपो दराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष्य! कोणते शेअर्स तोट्यात?

Pune News: पुण्यात पीएमपीएमएल बस चालकांना तंबाखू सेवनावर बंदी, नियमभंग केल्यास.... ; काय आहेत नवीन नियम?

Marathi Breaking News LIVE: जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करणार, पक्षांतर्गत वाद उग्र

Latur Accident: ट्रक-कारच्या अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

Solapur News:'आंदोलनातील शिक्षकांवर विनावेतनाची कारवाई'; आज शाळा बंद आंदोलन, मध्यवर्ती संघटनेचा नाही पाठिंबा !

SCROLL FOR NEXT