BJP-NCP clash in 319 Gram Panchayats satara election vote shiv sena politics esakal
सातारा

Gram Panchayat Election : भाजप- राष्ट्रवादीत ३१९ ग्रामपंचायतींत संघर्ष; महाविकास, युती बाजूला पडणार

बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेनाही रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, यावेळेस स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या गटातच लढती होणार आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीत वर्चस्व राखण्यासाठी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांनीही लक्ष घातल्यामुळे या दोन पक्षातच सत्ता संघर्ष रंगणार आहे. जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या (शुक्रवार) अखेरच्या दिवसापर्यंत सरपंचपदाच्या ३१९ जागांसाठी १४४१, तर सदस्य पदाच्या २६६१ जागांसाठी तब्बल ६९५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही मागील काही निवडणुकीत राष्ट्रवादीची पडझड झाली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे.

त्यामुळे आता भाजपने सर्व निवडणुकांत लक्ष घालण्याची तयारी केली आहे. गावपातळीवर राष्ट्रवादीची ताकद असली, तरी नेत्यांसोबत कार्यकर्तेही भाजपचे कार्यकर्ते झाल्याने यावेळेस सर्वच निवडणुकांत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सत्ता संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी प्रत्येक मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले आहे.

त्यासाठी भाजपचे दोन आमदार, दोन खासदार यांच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत; पण भाजपला आगामी निवडणुकांत अडविण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी त्यांना उद्धव ठाकरे शिवसेना व काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे, तसेच राष्ट्रवादीचा पण भाजपमध्ये सहभागी झालेल्या गटाचीही मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर आमदार, खासदारांच्या गटाच्या माध्यमातून पॅनेल टाकली जाणार आहेत. पाटण, कोरेगाव, महाबळेश्वरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे, तर सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड, खंडाळा, फलटण, माण, खटावमध्ये राष्ट्रवादी व भाजपच्या गटातच लढती होतील.

त्यामुळे राष्ट्रवादीसोबतच भाजप, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील नेते या संघर्षात भिडणार आहेत. भाजपशी दोन हात करताना राष्ट्रवादीला प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे, तर भाजपसोबत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, रयत क्रांती संघटना, रासप सहभागी होणार आहेत. जास्तीतजास्त ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपमध्येच संघर्ष होणार आहे. परिणामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा पाया भक्कम करण्याची तयारी या दोन पक्षांकडून होणार आहे.

तालुकानिहाय दाखल अर्ज

सातारा : सरपंच १४०, सदस्य ८५०, कऱ्हाड ः सरपंच १८९, सदस्य १०१९, पाटण : सरपंच ३६०, सदस्य १६७८, कोरेगाव : सरपंच २०७, सदस्य १०१२, वाई : सरपंच ३५, सदस्य १९७, खंडाळा : सरपंच २०, सदस्य १३४, महाबळेश्वर : सरपंच १३, सदस्य ६०, जावळी : सरपंच ४६, सदस्य १९०, फलटण : सरपंच १६९, सदस्य ७३६, माण : सरपंच १८३ सदस्य ७७६, खटाव : सरपंच ७९, सदस्य ३०५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

Latest Marathi News Live Update : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्याबाहेर सुषमा अंधारेंकडून ठिय्या

मित्रांसोबत दारू प्यायला जाताय? मग पुष्कर श्रोत्रीने सांगितलेले 'हे' चार नियम नक्की पाळा, म्हणतो- माझे वडील म्हणाले...

Supreme Court : 'महाकाल मंदिरासाठी आमची 200 वर्षे जुनी मशीद पाडली'; मुस्लिम पक्षाची सर्वोच्च न्यायालयात धाव, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT