सातारा

भाजपमुळे वाढणार 'साविआ'ची डोकेदुखी; मनसुब्यांवर बोळा फिरण्याची शक्‍यता!

गिरीश चव्हाण

सातारा : पालिकेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आपले स्वतंत्र अस्तित्व आणि गट कायम राखला आहे. त्यामुळे यावेळी होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवेळीसुद्धा भाजप तटस्थ राहून आपल्याच विचारांचा नगरसेवक सभागृहात आणण्याच्या मानसिकतेत सध्या तरी आहे. भाजपने घेतलेल्या या भूमिकेमुळे सातारा विकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असून, हद्दवाढीनंतरचा राजकीय समतोल राखण्याच्या त्यांच्या मनसुब्यांवर बोळा फिरण्याची शक्‍यता यामुळे निर्माण झाली आहे. 

सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. या सत्तेच्या जोरावर सातारा विकास आघाडीने कधी "नविआ'ची तर कधी भाजपची कोंडी वेळोवेळी केलेली आहे. राजकीय उलथापालथीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडून भाजपत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे सातारा पालिकेवर अनौपचारिक भाजपचा झेंडा फडकला. पालिकेवर भाजपचा अनौपचारिक झेंडा असला तरी राज्यपातळीवरील कामकाजादरम्यान भाजपचे धोरण आणि सातारा पालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये "साविआ' आणि "नविआ'ने आपले स्वतंत्र धोरण तसेच ठेवले आहे. 

दोन्ही नेते भाजपत आले असले तरी आवश्‍यक त्या प्रमाणात स्थान आणि संधी मिळत नसल्याची खंत सातारा पालिकेच्या सभागृहात असणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांत होती. याविषयी मध्यंतरीच्या काळात निवेदनांचा पाऊसदेखील पडला. याच खदखदीतून सातारा पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसह भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलनांचा बारसुध्दा उडवून दिला होता. भाजपच्या स्वीकृत नगरसेवकाने मुदत संपल्याने राजीनामा दिल्यानंतर स्वीकृत नगरसेवकाच्या हालचालींना वेग आला आहे. "साविआ'च्या वाट्याला आलेल्या दोनपैकी एका जागेवर ऍड. दत्ता बनकर हे कायम राहण्याची शक्‍यता आहे. उर्वरित एका जागेवर हद्दवाढीनंतर नव्याने पालिकेत आलेल्या भागाला संधी द्यायचे झाल्यास "साविआ'च्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. 

ही डोकेदुखी वाढू नये यासाठी "साविआ' जागा तुमची, उमेदवार आमचा असा फॉर्म्युला भाजपपुढे ठेवेल, अशी चर्चा पालिका कारभाऱ्यांच्यात होती. या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी असा फॉर्म्युला मान्य नसल्याचे स्पष्ट करत वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर हालचाली करणार असल्याचे स्पष्ट केले. एकंदरच स्थानिक भाजप पदाधिकारी "साविआ'चा हात आपल्या हातात घेण्याच्या मानसिकतेत सध्यातरी नसल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणाचा रेटा लावल्यास आणि त्यांच्या बाजूने राज्यपातळीवर नेतृत्वाने कौल दिल्यास आगामी काळात स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी "साविआ'ची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT