Traffic to Panchgani Mahabaleshwar esakal
सातारा

Mahabaleshwar : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! महाबळेश्‍वरला जाताय? मग, 'या' मार्गात झालाय मोठा बदल

महाबळेश्‍वरकडून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना या रस्त्याचा वापर करता येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

सातारा : गर्दी वाढल्यामुळे सात ते २५ जून या कालावधीत दर शुक्रवार, शनिवार व रविवारी पाचगणी व महाबळेश्‍वरकडे (Panchgani and Mahabaleshwar) जाणाऱ्या वाहतुकीत पोलिस अधीक्षक समीर शेख (Police Sameer Sheikh) यांनी बदल केले आहेत.

या बदलानुसार मुंबई व पुण्याकडून येणाऱ्या वाहनांनी सुरूर फाटा-वाईमार्गे यायचे आहे; परंतु महाबळेश्‍वरकडून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना या रस्त्याचा वापर करता येणार नाही. या वाहनांनी महाबळेश्‍वरवरून मेढा-कुडाळ-पाचवड फाटा या रस्त्याने महामार्गाकडे जायचे आहे.

पाचगणीवरून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी संजीवन विद्यालय-रुईघर-करहर-कुडाळ-पाचवड फाटा या मार्गे पुण्याकडे जायचे आहे. महाबळेश्‍वरवरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी मेढा-सातारा या रस्त्याचा उपयोग करायचा आहे. या वाहतूक बदलाबाबत काही हरकती असल्यास disttraffic.satara@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Pollution: उत्तर भारतावर प्रदूषणाची चादर, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावली; पाहा आजचे AQI

Honey Trap: आधी मैत्री, मग जवळीक अन् नंतर प्रेमाचं जाळं! हेरगिरीसाठी कसा केला जातो 'हनी ट्रॅप'चा वापर?

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी असला तरी 'या' एका निर्णयामुळे पगारात होणार मोठी वाढ; आठव्या वेतन आयोगाचं सोपं गणित

Investment Fraud: वीस दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष ;गोव्यातील कॅसिनोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

Latest Marathi News Live Update: मायक्रो फायनान्स कंपनीवर कारवाई होणार- संजय राठोड

SCROLL FOR NEXT