Dnyaneshwar Maharaj Palkhi esakal
सातारा

Ashadhi Wari : पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; 'ही' वाहतूक पूर्णपणे बंद, पोलिस अधीक्षकांची माहिती

ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी १८ ते २३ जून यादरम्यान जिल्ह्यातून जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

वाहनधारकांनी वाहतूक बदलांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक शेख यांनी केले आहे.

सातारा : संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी (Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी १७ ते २३ जून या कालावधीत पोलिस अधीक्षक समीर शेख (Sameer Sheikh) यांनी वाहतुकीमध्ये बदल केले आहेत.

ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी १८ ते २३ जून यादरम्यान जिल्ह्यातून जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. शनिवार (ता. १७) ते बुधवारी (ता. २१) या दरम्यान फलटण-लोणंद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.

शनिवारी सकाळी ६ पासून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत फलटणमधून नीराकडे जाणारी वाहने बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुण्याकडे शिरगाव घाटाने जातील. शनिवारपासून २० जूनपर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे जाणारी वाहतूक पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज इतरांना बंद करण्यात येईल. शनिवारपासून २२ जूनच्या दुपारी एकपर्यंत लोणंदमधून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्कीमार्गे वळविण्यात येतील.

२१ ते २३ जूनच्या सायंकाळी चारपर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तर, २१ ते २३ जूनपर्यंत नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज, बारामती पूलमार्गे पुण्याकडे वळविण्यात येईल. २१ ते २३ जूनच्या सायंकाळी चारपर्यंत नातेपुतेकडून फलटणमार्गे साताऱ्याकडे येणाऱ्या वाहनांनी शिंगणापूर तिकाटणेमार्गे दहिवडी-सातारा यायचे आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी नातेपुते-दहिगाव-जांब-बारामतीमार्गे जातील.

२१ ते २३ जूनच्या दुपारी दोनपर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापूर-जावळी-कोळकी-झिरपवाडी-विंचुर्णी-ढवळपाटी-वाठार फाटामार्गे वळविण्यात येणार आहे. २२ जून रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून बरड मुक्कामी जाणार आहे. यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पालखीतील वाहनांनी फलटण-पंढरपूर रस्त्याने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहिवडी चौक, कोळकी, शिंगणापूर तिकाटणे, वडले, पिंप्रद, बरड असे जायचे आहे. वाहनधारकांनी वाहतूक बदलांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक शेख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT