CM Eknath Shinde esakal
सातारा

Mahabaleshwar : ट्रॅक पँट अन् ब्ल्यू टी शर्ट.. मुख्यमंत्री रमले शेतात, पत्नीसह केली केळी-नारळाची लागवड

मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या गावी दरे तांब येथे अचानक दाखल झाले.

रविकांत बेलाेशे

गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा कोयनेच्या नदीपात्रात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

भिलार : महाबळेश्‍वर (Mahabaleshwar) तालुक्याचे भूमिपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या जन्मगावी दरे येथे आले असून, त्यांनी गावातच जनता दरबार भरवून आलेल्या नागरिकांच्या समस्यांचा निपटारा केला. शेतीत रमत झाडांची लागवडही केली.

गावात गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार (Galmukt Dharan Galyukt Shivar) या योजनेचा प्रारंभ केला. मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या गावी दरे तांब येथे अचानक दाखल झाले. मुख्यमंत्री खासगी दौऱ्यानिमित्त आपल्या गावी आल्याचे समजताच राज्यभरातील हजारो नागरिकांनी दरे तांब गावाकडे धाव घेतली.

चक्क कोयना नदीच्या उघड्या पडलेल्या पात्रातून पायपीट करत विविध समस्या घेऊन नागरिक आल्याने मुख्यमंत्र्यांनी जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांना त्या तत्काळ सोडविण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांना शेतीची पहिल्यापासून ओढ असून, ते वेळ मिळेल तेव्हा आपल्या गावी येऊन शेती करण्यावर भर देतात. आता मुख्यमंत्री असतानाही त्यांना शेतीची ओढ सुटत नसून वेळात वेळ काढून ते आपल्या शेतीत रममाण झाले.

त्यांनी केळीसोबत नारळ, आंबा अशा विविध झाडांची लागवड करत आपल्या शेतीत फेरफटकाही मारला. कोयना जलाशयामध्ये गाळाची भर अधिक होऊ लागली असून, ही सुपीक गाळयुक्त माती शेतीला अधिक उपयुक्त असून, शेतकऱ्यांनी हा गाळ माती काढून आपल्या शेतीत टाकल्यास पिकांना अधिक बळ मिळेल.

तर धरणातील गाळ माती कमी होऊन पाणीसाठ्यात वाढ होईल. त्या पाण्याचाही शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो. त्यामुळे गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा कोयनेच्या नदीपात्रात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार महेश शिंदे, विविध खात्यांचे सचिव, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री रविवारी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT