सातारा

'सर्वधर्मसमभाव जोपासणारे कॉंग्रेसचे नेतृत्व हरपले'

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. बाळासाहेब ऊर्फ शमशुद्दीन मकबुलभाई बागवान यांच्यावर शनिवारी येथील ईदगाह कब्रस्तानमधील दफनभूमीत हजारो जनसमुदयाच्या साक्षीने, साश्रू नयनांनी अंतिम संस्कार करण्यात आले.
 
या वेळी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, विराज शिंदे, सुभाषराव शिंदे, नितीन भरगुडे- पाटील, आनंदराव शेळके- पाटील, दत्तानाना ढमाळ, रमेश धायगुडे, रमेश शिंदे, प्रा. एस. वाय. पवार, रखमाजी सरक, नगराध्यक्ष सचिन शेळके- पाटील व नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
 
दरम्यान, त्यांच्या सईबाई हाउसिंग सोसायटीतील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची रिग लागली होती. शनिवारी अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. लोणंद- सातारा रस्ता मार्गे शास्त्री चौक, गांधी चौक, तानाजी चौक, स्टेशन चौक व अहल्यादेवी चौकातून कब्रस्तानमध्ये नेण्यात आली. त्या वेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. चौकाचौकांत त्यांना पुष्पहारही अर्पण करण्यात आले. या वेळी ध्वनिक्षेपकांवरून शासनांच्या नियमांचे पालन करा, मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळा, या सूचना सतत देण्यात येत होत्या. ऍड. बाळासाहेब बागवान अमर रहे'च्या घोषणाही देण्यात आल्या. या वेळी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे व लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

पाेलिस दादांच्या धावपळीने मिळाला लाख माेलाचा आनंद; विद्या निंबाळकरांना आनंदाश्रु 
 
या वेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ""सर्वधर्मसमभाव जोपासणारे कॉंग्रेसचे नेतृत्व हरपले. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. ही पोकळी भरून न येणारी आहे. खासदार व आमदारांनी आता लोणंदच्या विकासासाठी विकास निधी द्यावा. त्यांच्या मुलांना ताकद द्यावी.''
 
श्रीनिवास पाटील म्हणाले, ""एका चांगल्या व्यक्तिमत्त्वाला आपण पोरके झालो. कोणी कोणावर प्रेम करावे हे कुठे कायद्यात लिहिले नाही. आघाडीमध्ये सोयरसंबंध कसे ठेवावेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेब बागवान होते. माझा अलीकडचा परिचय, निवडणुकी दरम्यान येथील एका वस्तीच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रत्यक्ष त्या वस्तीत नेऊन सांगितला. तो प्रश्न मार्गी लागेल तेव्हा त्यांच्या नावाने तो लोकार्पण करावा.''  आमदार मकरंद पाटील, आनंदराव शेळके- पाटील, एस. वाय. पवार, सुरेश जाधव, नितीन भरगुडे - पाटील, दादासाहेब शेळके, एन. डी. क्षीरसागर यांचीही भाषणे झाली. 

पुणे- सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील शहरात अनिश्चित काळासाठी लाॅकडाउन; अत्यावश्‍यक सेवा मिळणार घरपोच 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT