Karad Municipality
Karad Municipality esakal
सातारा

खड्ड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा अंत

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.

कऱ्हाड (सातारा) : येथील बुधवार पेठेत पालिकेने (Karad Municipality) खोदलेल्या खड्ड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. यावरून सामान्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. निषेधाचे फ्लेक्सही लावले आहेत. मात्र, त्या घटनेबाबत अथवा ठेकेदाराच्या हालगर्जीपणाबाबत एकाही नगरसवेकाची काहीही प्रतिक्रिया अद्यापही आलेली नाही किंवा नगरसेवक (Corporator) काहीच बोलण्यास तयार नाहीत. काहींनी कुटुंबांला भेटून सांत्वनाचे सोपस्कर पूर्ण केले असले, तरी त्या नगरसवेकांच्या सार्वजनिक भूमिका गुलदस्त्यात आहेत. पोलिसांनी (Karad Police) गुन्हा दाखल केल्यानंतर पालिकेकडून ठेकेदारावर प्रशासकीय कारवाईचा अहवाल नगरसवेकांना दिला जाणार आहे. त्यामुळं नगरसेवक ठेकेदारांशी लागेबांधे जपणार की, सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेणार याकडं लक्ष लागून राहिलंय.

बुधवार पेठेतील पालिकेने एका चौकाच्या सुशोभीकरणासाठी खड्डा खणला होता. त्या खड्ड्यात पडून चार वर्षाच्या तेथीलच विराट चव्हाण नावाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. त्यावरून शहरात जोरदार वादळ उठले. त्यानंतर पालिकेच्या निष्काळजीपणाच्या निषेधाचे फ्लेक्स झळकले. पोलिसांनी पहिल्याच दिवशी त्याबाबत तीन ठेकेदारांवरील गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पालिकेने पोलिसांना त्या चौकातील सीसीटिव्ही फुटेज दिले. विराट खड्ड्यात दगड मारताना खड्ड्यात पडल्याचे स्पष्ट झाले. तेथे बॅरिकेट्स न लावल्याचा निष्काळजीपणा केल्याचे दिसल्याने पालिकेने त्या विरोधात पोलिसांना अहवाल दिला आहे. त्यासोबतच खड्डा खणताना सार्वजनिक पाईपलाइन फोडल्याचीही तक्रार पोलिसात दिली आहे. पालिका, पोलिस कारवाई करत असतानाच त्या सगळ्यावर एकाही नगरसवेकाने जाहीर भूमिका घेतलेली नाही.

ठेकेदारांशी लागेबांधे असल्यानेच त्यांना भूमिका घेता येत नसल्याची शहरात चर्चा आहे. पालिकेने त्या ठेकेदारांवर प्रशासकीय कारवाईचा अहवाल केला आहे. प्रशासकीय कारवाईसाठी तो अहवाल प्रशासन मासिक बैठकीत ठेवणार आहे. त्यावर नगरसवेक काय निर्णय घेणार याकडे शहराचे लक्ष आहे. काहींनी त्या कुटुंबांच्या सात्वंनाचे सोपस्कर पूर्ण केले आहेत. मात्र, घटनेवर किंवा ठेकेदरांच्या निष्काळजीपणावर कोणीच काहीच भाष्य करताना दिसत नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील त्या रात्री घटनास्थळी व पोलिस ठाण्यात होते. मात्र, अन्य नगरसवेक त्या प्रकरणात फारसे दिसले नाहीत. त्यामुळे नगसवेक अन् ठेकेदारांच्या संबंधावरून शहरात उलटसुलट चर्चा आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षात ११ जणांना जीव गमवावा लागलेला असतानाही नगरसवेक ठेकेदारांबाबत काहीच भूमिका घेत नाहीत. त्यामुळे विराटच्या मृत्यूनंतर पालिकेकडून त्या ठेकेदारावरील प्रशासकीय कारवाईचा अहवाल मासिक बैठकीत मांडला जाईल, त्याबाबत नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.

शाळा क्रमांक दहालगतच्या खड्ड्यात पडलेला मुलगा निव्वळ ठेकेदाराने घेतलेल्या निष्काळजीपणानेच पडला आहे. त्या भोवती बॅरिकेटस् हव्या होत्या. बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर प्रशासकीय कारवाई होणार आहे. त्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर विषय ठेवला जाणार आहे.

-रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT