Koregaon esakal
सातारा

'ही एकसळचीच पोरं का, हाणारे यांना..; कोरेगावात दोन गटात तुफान राडा

राजेंद्र वाघ

'ही एकसळचीच पोरं आहेत काय? असं म्हणून आम्हाला हॉकी स्टीक, दांडके, दगड, लाथाबुक्क्याने मारहाण केली.

कोरेगाव (सातारा) : कोरेगाव व एकसळ या दोन गावांतील गटांमध्ये हॉकी स्टीक, लाकडी दांडके, दगड, कोयता, चॉपरने झालेल्या मारामारीप्रकरणी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, याप्रकरणी दोन्ही बाजूंकडील 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात रणजित विजय चव्हाण (रा. एकसळ, ता. कोरेगाव) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गुरुवारी (ता. २५) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोरेगाव येथील अजिंक्यनगर येथील कमानीजवळ मी, तसेच मित्र तन्मय विजय भोसले, ओंकार श्रीकांत भोसले (रा. एकसळ) असे आम्ही मित्रांची वाट पाहात थांबलो असताना शुभम सुतार, मदन सुतार, मयूर पंडित, निखिल पंडित, स्वप्नील सुतार, अनिकेत बर्गे, गणेश बर्गे, स्वरूप गुरव (सर्व रा. चौथाई गल्ली, कोरेगाव) यांनी तेथे येऊन ‘ही एकसळचीच पोरं आहेत काय? असे म्हणून आम्हाला हॉकी स्टीक, दांडके दगड, लाथाबुक्क्याने मारहाण करून आमच्या गळ्यातील एक तोळा व अडीच तोळ्याच्या सोन्याच्या चेन कोणीतरी ओढून तोडून नेल्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक ए. ए. शिंदे तपास करत आहेत.

दुसरी फिर्याद मयूर धनंजय पंडित (रा. चौथाई गल्ली, कोरेगाव) याने दिली आहे. त्यात म्हटले आहे, की काल (ता. २५) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोरेगाव येथील अजिंक्य कॉलनीच्या कमानीजवळील फोटो स्टुडिओसमोर केतन भोसले, ऋषिकेश भोसले, रणजित चव्हाण, आकाश जगदाळे, तन्मय भोसले, ओमकार भोसले, सकलिन शेख, अजहर शेख (सर्व रा. एकसळ) व त्यांच्या सोबतच्या अंदाजे दहा ते पंधरा जणांनी मित्र स्वरूप ऊर्फ शंभू गुरव हा चौथाईगल्ली येथे राहतो, या कारणावरून मला, तसेच मित्र शुभम सुतार, मदन सुतार (दोघे रा. चौथाईगल्ली, कोरेगाव) यांना हाताने, लाथाबुक्याने, दांडक्याने, कोयत्याने, चॉपरने मारहाण करून जखमी केले. या वेळी मित्र शुभम सुतार याच्या हातातील मोबाईल त्यांच्यापैकी कोणीतरी घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. बी. राऊत तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Oppo Reno 14 Launch : एकच झलक, सबसे अलग! लाँच झाली Oppo Reno 14 सिरीज; 50MP कॅमेरे, 1TB स्टोरेजसह AI फिचर्स अन् किंमत फक्त..

Athani Road Accident : शाळेला जाणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाला कारने उडविले; अगश्य जागीच ठार, घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश

Crime News: हातगाडीला धडक दिल्याने युवकाला बेदम मारुन ठार केलं; शहरात जातीय तणाव

Imtiaz Jaleel : पोलिसांची नोटीस स्वीकारण्यास इम्तियाज जलील यांचा नकार

SCROLL FOR NEXT