Dhebewadi Market
Dhebewadi Market esakal
सातारा

बाजारपेठेत गर्दी उसळताच पोलिसांनी भाजीपाला भरला टेंपोत; शेतकऱ्यांत नाराजी

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आठवडा बाजारासह बाजारपेठही (Dhebewadi Market) बंद असताना येथे भाजीपाला व किराणामाल खरेदीसाठी झुंबड उडाल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून गर्दी पांगवली. रस्त्यावर विक्रीस ठेवलेला भाजीपाला टेंपोतून भरून नेला. (Crowd Of Citizens In Dhebewadi Market Satara Marathi News)

जनता कर्फ्यू पाठोपाठच प्रशासनाने घातलेल्या कडक निर्बंधांची (Lockdown) चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केल्याने ढेबेवाडी सद्यःस्थितीस कोरोनामुक्त झालेली असली, तरी अधूनमधून विशेषतः मंगळवारी आठवडा बाजाराच्या दिवशी खरेदी, बॅंकिंग व दवाखान्यात उपचाराच्या निमित्ताने आजूबाजूच्या गावातून येथील बाजारपेठेत होणारी गर्दी चिंता वाढवणारी ठरत आहे. आजही त्याचा प्रत्यय आला. आठवडा बाजाराचा दिवस असल्याने परिसरातील विविध गावांतील नागरिक येथे खरेदी व अन्य कामानिमित्ताने आले होते. रस्त्यावर काही भाजी विक्रेत्यांनी दुकाने मांडली होती. शटर बंद असतानाही किराणा दुकानासमोर नागरिकांची गर्दी दिसत होती.

बॅंकेसमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रांग लागलेली होती. बाजार भरलाय की काय? अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याने सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने बाजारपेठेत धाव घेऊन गर्दी पांगवली. रस्त्यावर भाजीविक्री करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत भाजीपाला टेंपोत भरून माघारी पाठवले. रस्त्याशेजारी पार्क केलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली. संतोष पवार म्हणाले, "नियमभंग करणारे दुकानदार, भाजीपाला विक्रेते, नागरिक, वाहनचालक यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू आहे. यापुढेही ती सुरूच राहणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम पुन्हा नव्याने सुरू करण्यात येणार आहे.''

वांग खोऱ्याच्या मातीतला शेरदिल सुपुत्राची जगण्याची लढाई जरुर वाचा

Crowd Of Citizens In Dhebewadi Market Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

SCROLL FOR NEXT