सातारा

जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रुपेश कदम :

या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात आले आहे, तसेच मुद्देमाल सुध्दा हस्तगत करण्यात आला आहे.

दहिवडी (सातारा): दहिवडी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात आले आहे, तसेच मुद्देमाल सुध्दा हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी, २०२०-२१ या काळात दहिवडी पोलिस ठाणे हद्दीत जनावरे चोरीस जाण्याचे वाढले होते. पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांच्या नावे चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिस चोरट्यांचा शोध घेत होते मात्र चोरांचा मागमूस लागत नव्हता. जनावरे मालकांच्यात पोलिसांबद्दल रोष निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला होता.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शक सुचनानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ व पोलिस नाईक रविंद्र बनसोडे यांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे जनावरे चोरी करणारी टोळी पकडून गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे.

याप्रकरणी सागर जालिंदर पाटोळे (वय : २८ वर्षे, रा. वेजेगाव, ता. खानापूर, जि. सांगली), भगवान ज्ञानदेव चव्हाण (वय : ६० वर्षे, रा. हतीत, ता. सांगोला, जि. सोलापूर), तर आंधळी (ता. माण) गावचे संतोष छगन चव्हाण (वय : २५ वर्षे), राजेंद्र छगन चव्हाण (वय : ४० वर्षे) व संजय माणिक आडके (वय : ३५ वर्षे) व त्यांचे साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेले जनावरे चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपींकडून नऊ गुन्ह्यात चोरीस गेलेली ९ गायी व १ म्हैस अशी ३,५६,००० रुपये किमतीची जनावरे हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपींकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्यांच्या तपास पथकात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित व देवानंद तुपे, सहायक फौजदार प्रकाश हांगे व अशोक हजारे, पोलिस हवालदार संजय केंगले, पोलिस नाईक नितीन सजगणे, पोलिस शिपाई प्रमोद कदम व होमगार्ड तानाजी मुळीक यांचा सहभाग होता. पुढील तपास पोलिस हवालदार संजय केंगले करत आहेत.

राजवडी (ता. माण) येथील सचिन भोसले यांची चोरीस गेलेली गाय तीन ते चार महिन्यानंतर मिळाल्याने त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. ते गायीच्या गळ्यात पडून मला ओळखलंस का असे रडून विचारत होते. सर्वच जनावरे मालकांनी सपोनि राजकुमार भुजबळ, पोलिस नाईक रविंद्र बनसोडे व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT