Nitin Laxmanrao Patil esakal
सातारा

शरद पवारांच्या आशीर्वादामुळं नितीन काका अध्यक्ष झाले; पण..

उमेश बांबरे

अध्यक्षपदाच्या निवडीत शरद पवारांनी नितीन काकांना संधी दिली; पण त्यांचं कौतुक करायला आज तात्या हयात नाहीत.

सातारा : खासदार शरद पवारांच्या (Sharad Pawar) सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सातारा जिल्हा बँकेच्या (Satara District Bank Election) अध्यक्षपदी नितीन लक्ष्मणराव पाटील (Nitin Laxmanrao Patil) यांचे नाव जाहीर केले. काल त्यांची बिनविरोध निवड झाली. मुळात माझ्या हयातीत नितीन काका कुठल्यातरी पदावर जावा किंवा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर जावा, अशी माजी खासदार (कै.) लक्ष्मणराव पाटील (Laxmanrao Patil) यांची इच्छा होती. आज तात्या आपल्यात नाहीत; पण शरद पवारांच्या आशीर्वादामुळे नितीन काका जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. या आनंदाच्या क्षणी काकांचे कौतुक करण्यासाठी तात्या नाहीत. त्यांच्या आठवणीने काकांना आज गहिवरून आले; पण वाई तालुक्यातील तात्यांच्या कार्यकर्त्यांनी आज ही उणीव भरून काढत काकांवर कौतुकाचा वर्षाव करत खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.

जिल्हा बँकेची स्थापना यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी केली, तर किसन वीर आबा, रघुनाथराव पाटील, बाळासाहेब देसाई, विलासराव पाटील उंडाळकर, अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील यांनी बँकेची धुरा व्यवस्थित सांभाळत बँकेची यशस्वी वाटचाल केली. बँकेचे नाव देश पातळीवर पोचवले. त्यामुळे बँकेला एक नावलौकिक प्राप्त झालेला आहे. सध्या खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत विलासराव उंडाळकरांच्या नंतर लक्ष्मणराव पाटील यांनी बँकेची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली. लक्ष्मणराव पाटील ऊर्फ तात्या हे दोन पंचवार्षिक सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले. तात्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत प्रत्येक तालुक्यात आपल्या कार्यकर्त्यांचा गट निर्माण केला होता. हे सर्व तालुक्यातील गट सांभाळण्याचे काम त्यांचे चिरंजीव नितीन काका करत होते, तसेच त्यांनी दुसरे चिरंजीव मकरंद पाटील (Makarand Patil) यांना आमदार केले, त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच खासदार शरद पवारांकडून साथ मिळाली; पण त्यांचे सर्व तालुक्यातील गट सांभाळणारे नितीन काकांना कोणत्यातरी पदावर काम करताना पाहायचे होते.

Nitin Laxmanrao Patil

त्यामुळे त्यांना वाई सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेवर संचालक केले, तर तात्या स्वतः खरेदी- विक्री संघ मतदारसंघातून बँकेवर संचालक होते. नितीन काकांना जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्याचे तात्यांना पाहायचे होते; पण आजारपणामुळे तात्यांचे निधन झाले व ते हयातीत असताना काकांना पद मिळू शकले नाही. ही खंत पाटलांच्या कुटुंबातील सर्वांनाच होती; पण जिल्ह्यातील बदलते राजकारण आणि पक्षातील गट- तट लक्षात घेऊन काकांनी तात्यांच्या मागे त्यांच्या समर्थकांचा प्रत्येक तालुक्यातील गट सांभाळला. आज जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत खासदार शरद पवार यांनी नितीन काकांना संधी दिली; पण नितीन काका बँकेचे अध्यक्ष झाल्याचे पाहायला व त्यांचे कौतुक करायला आज तात्या हयात नाहीत. याची खंत काकांना लागून राहिली आहे. जिल्हा बँकेत अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यानंतर नितीन काकांनी प्रतिक्रिया देताना त्यांना तात्यांची आठवण झाली अन् त्यांना गहिवरून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT