Udaysingh Undalkar esakal
सातारा

'पराभवानं खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीनं कामाला लागा'

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

'कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागावे.'

कऱ्हाड (सातारा) : कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागावे, अशी प्रतिक्रीया अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Undalkar) यांनी पराभवानंतर व्यक्त केली. उंडाळकर म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election) संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत कऱ्हाड सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यात कऱ्हाड तालुक्यातील सर्व मतदार व कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन पाठिंबा दिला. निवडणूक म्हटलं की जय-पराजय ठरलेला असतो.

अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या लढतीत आपण मतदारांनी व कार्यकर्त्यांनी दिलेली साथ अत्यंत मोलाची आहे. याबद्दल कऱ्हाड सोसायटी गटातील सर्व मतदारांचे व अहोरात्र कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. पराभवाने खचून जावू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील प्रतिष्ठेच्या लढतीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी विजय मिळवून माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा 8 मतांनी पराभव केला. एका-एका मताची बेरीज करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकारमंत्र्यांनी भाजपच्या भोसले गटाला जवळ करुन शिष्टाईतून लढवलेल्या या निवडणुकीत परफेक्ट नियोजन करुन उंडाळकरांचा करेक्ट कार्यक्रम केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT