Satara Crime News esakal
सातारा

Minor Girl : पालकांनो, वेळीच काळजी घ्या! घरात झोका खेळताना मान अडकून चिमुरडीचा मृत्यू

पौर्णिमा ही घरातील लोखंडी पाइपला साडी बांधून त्यामध्ये बसून झोका खेळत होती.

सकाळ डिजिटल टीम

घरातील लोकांनी तिच्या मानेचा फास सोडवून तिला येथे रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

वडूज : घरात लोखंडी पाइपला साडी बांधून झोका खेळत असताना त्यामध्ये मान अडकून नऊ वर्षांच्या मुलीचा (Minor Girl) मदुर्दैवी मृत्यू झाला. पौर्णिमा शंकर फाळके (वय ९, रा. तडवळे, ता. खटाव) असं मृत मुलीचं नाव आहे.

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पौर्णिमा ही घरातील लोखंडी पाइपला साडी बांधून त्यामध्ये बसून झोका खेळत होती. त्या वेळी झोका खेळताना तिची मान साडीमध्ये अडकून तिच्या गळ्याला फास लागला. तिनं आरडाओरडा केल्यानंतर घरातील लोकांच्या लक्षात हा प्रकार निदर्शनास आला.

घरातील लोकांनी तिच्या मानेचा फास सोडवून तिला येथे रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शंकर पोपट फाळके यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला पोलिस हवालदार ए. एल. वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT