Dhom Dam News esakal
सातारा

धोम धरणाच्या डाव्या कालव्याला पडलं मोठं भगदाड; ऊसतोड मजुरांचा संसार गेला वाहून, 12 बैल वाचवण्यात यश

दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून 12 बैल वाचवण्यात यश आले आहे.

भद्रेश भाटे

पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की, कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले.

Dhom Dam News : वाई तालुक्यातील धोम धरणाचा (Dhom Dam) डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे.

दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून 12 बैल वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलीस (Bhuinj Police) ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता पोहचले. ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

आधीच जिल्ह्यात दुष्काळ आहे. पाऊस कमी झाल्याने खटाव- माणसह जिल्ह्यातील जनता पाणी पाणी करू लागली आहे. दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले गेले आहे. त्याच कालव्याला पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले.

पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की, कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले. शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले. दिवसभर ऊस तोड करून झोपलेल्या ऊसतोड मुजरांच्या दीडशे झोपडयात पाणी शिरले. त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. 12 बैल वाचवण्यात यश आहे. दोन बैल बेपत्ता झाले असून याची शोध मोहीम सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT