सातारा

आर्थिक जनगणनेसाठी सहकार्य करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्हास्तरीय समितीच्या नियंत्रणाखाली सातव्या आर्थिक गणनेचे काम एक डिसेंबरपासून नगरपालिका हद्दीत सुरू झाले आहे. या गणनेद्वारे एकत्रित केलेली माहिती गोपनीय राहणार असल्याने नागरिकांनी वस्तुनिष्ठ माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. 

श्री. सिंह म्हणाले, "केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्यात सातवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. या गणनेद्वारे उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय व राज्य उत्पनाचे अचूकपण तयार करण्यात येणार आहे. ही माहिती स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर प्रशासकीय व्यवस्थापन व नियोजनासाठी आवश्‍यक आहे. आर्थिक गणना अनोंदणीकृत व असंघटित उद्योगातील रोजगारविषयक आकडेवारीचा स्त्रोत आहे. त्यामुळे सातव्या आर्थिक गणनेचे क्षेत्रीय काम गुणवत्तापूर्वक होणे आवश्‍यक आहे.'' 

जिल्ह्यातील खेडेगाव, शहरे व नगरपालिकांमधील जनगणना 2011 च्या रजिस्टरमधील सर्व गटांमध्ये समाविष्ट कुटुंबे व उद्योगांची गणना होणार आहे. या गणनेमध्ये हंगामी व बारमाही पिके, शासकीय कार्यालये, आंतरराष्ट्रीय संस्था, न्यायालये, कर कार्यालय, संरक्षण मंत्रालय, पोलिस, आंतरराष्ट्रीय संस्था-राष्ट्रसंघ, परदेशी वकिलाती, सरकारने अनधिकृत घोषित केलेल्या आस्थापना-जुगार, पैजा आदी सोडून उर्वरित सर्व आर्थिक कार्याची माहिती गोळा केली जाणार आहे. आर्थिक गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, संनियंत्रण व समन्वयासाठी राज्यस्तर व जिल्हास्तर अशा स्तरावर विविध समिती स्थापन केल्या आहेत. या गणनेचे जिल्हास्तरावरील काम कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) यांच्याकडून होणार असून, सातारा जिल्ह्यासाठी 1 हजार 537 पर्यवेक्षक व 1 हजार 967 प्रगणक नेमण्यात येणार असल्याचे श्री. सिंह स्पष्ट केले आहे. 

दीड वर्षात कऱ्हाड तालुक्‍यातील तब्बल 53 सहकारी संस्था दिवाळखोरीत!
 
जनगणनेत समावेश : आर्थिक गणनेत शासकीय शाळा, संस्था, महाविद्यालये, रुग्णालये, वसतिगृह, सदनिका, विश्रामगृह, अतिथीगृह, राष्ट्रीयीकृत बॅंका, सर्व सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांचा समावेश केल्याचे श्री. सिंह यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student suicide attempt: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT