Shekhar Singh Shekhar Singh
सातारा

साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; शाहूपुरीतील दुकानदारांवर गुन्हे

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ टीम

सातारा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोवईनाक्‍यावरील मीन कॉम्प्युटर्स ऍण्ड हार्डवेअर व रविराज स्टील सेटर तसेच पंताच्या गोटातील प्लास्टिक नॉयलॉन दुकान या तीन दुकानांचा समावेश आहे.

यामध्ये साताऱ्यातील पोवई नाका येथे इम्तियाज गुलाब शेख (रा. कवारे कॉलनी, शाहूपुरी) यांनी मीन कॉम्पुटर्स अँड हार्डवेअर सुरू ठेवले होते. याप्रकरणी पोलिस हवालदार चेतन ठेपणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पंतांचा गोट येथील संभाजी महादेव शिंदे (रा. गोडोली, सातारा) यांनी अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असूनही त्यांनी प्लास्टिक नॉयलॉन दुकान सुरू ठेवल्याचे आढळून आले.

याप्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पालिस कर्मचारी राहूल खाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोवई नाक्‍यावरील रविराज स्टिल सेंटर हे दुकान सुरू होते. याप्रकरणी अतुल मोहन कुंदक (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्याविरोधात पोलिस हवालदार चेतन ठेपणे यांनी तक्रार दिली. त्यानुसार कुंदक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murli Manohar Joshi on Vishwaguru : "आपण आता ‘विश्वगुरु’ नाही!" भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला घरचा आहेर, राजकीय चर्चेला उधाण

IPL 2026 : पाजी, बरं झालं रिषभ पंतला तुम्ही घेतले! PBKS च्या चाहत्यांनी उडवली खिल्ली, Sanjiv Goenka यांचा चेहरा पडला... VIDEO

Latest Marathi News Live Update : TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीची तारीख जाहीर

राजा शिवाजी सिनेमात रितेशच्या धाकट्या लेकाने साकारलीये भूमिका ! ट्रेलरमध्ये दिसली झलक

Mumbai Water: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ७ दिवस पाणीकपात होणार; कोणत्या भागांना फटका बसणार?

SCROLL FOR NEXT