BJP-NCP esakal
सातारा

'भविष्यात भाजप आमदाराच्या पाठीशीच ठाम उभं राहणार'

संदीप गाडवे

'गावच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण, गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे.'

केळघर : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्या माध्यमातून केळघर परिसरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जात आहेत. लोकांच्या मागणीनुसार कामेही पूर्ण केली जात आहेत. त्यामुळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण, गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी केले.

बाहुळे (ता. जावळी) येथे अंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सागर धनावडे, प्रवीण महाराज शेलार, सुनील जांभळे, गणपत ओंबळे, प्रकाश ओंबळे, सुरेश पार्टे, पोलिस पाटील मोहन जाधव, माजी सरपंच जगन्नाथ जाधव, दत्तात्रय जाधव, राजाराम जाधव, शंकर जाधव, किसन जाधव, वसंत जाधव, आनंदा जाधव, अशोक जाधव, रवींद्र जाधव, शांताराम जाधव, कोंडीबा जाधव, लक्ष्मण जाधव, एकनाथ जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून हे काम मंजूर झाले असून आगामी काळात आमदार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील साकव पूल, अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी शेड आदी कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही श्री. रांजणे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी ग्रामस्थानी रांजणेंच्या माध्यमातून भविष्यात आमदार भोसले यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचा शब्द दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT