Doctor Suhel Shikalgar esakal
सातारा

साताऱ्यात रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनशिवाय रुग्णांना बरं करणारा 'देवमाणूस'

विलास माने

मल्हारपेठ (सातारा) : मरळी कोविड सेंटरला डॉ. सुहेल शिकलगार (Marli Covid Center) यांच्यारूपाने देवमाणूस मिळाल्याच्या प्रतिक्रिया रुग्ण व्यक्त करत आहेत. तेथील कोविड बाधित (Corona Patient) झाल्याने प्रकृती नाजूक बनलेल्या सुमारे १५ रुग्णांना त्यांनी रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन (Remdesivir Injection) न देता उपचार करून बरे केले आहे. त्यांच्या या कामाचे पाटण प्रशासनाकडूनही कौतुक होत आहे. (Doctor Suhel Shikalgar Is Treating Covid Patients Without Remdesivir Injection Satara Positive News)

मल्हारपेठ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय डॉ. शिकलगार हे २०१५ पासून मल्हारपेठ आरोग्य केंद्रात सेवा बजावत आहेत.

मल्हारपेठ आरोग्य केंद्राचे (Malharpeth Health Center) वैद्यकीय डॉ. शिकलगार हे २०१५ पासून मल्हारपेठ आरोग्य केंद्रात सेवा बजावत आहेत. आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला चालक नव्हता. त्यावेळी डॉ. शिकलगार हे स्वतः गाडी चालवून रुग्णांना कऱ्हाड, साताऱ्याला उपचारासाठी घेऊन जात. त्यामुळे मल्हारपेठ आरोग्य केंद्रातील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा आलेख चढता राहिला. त्यांनी काही वेळेला अन्य ठिकाणी सेवा बजावण्यासाठी सांगितले गेले. मात्र, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या (Minister Shambhuraj Desai) प्रयत्नामुळे त्यांनी आत्तापर्यंत मल्हारपेठ आरोग्य केंद्रातच सहा वर्षे सेवा बजावली आहे.

कोविड काळात मरळी कोविड सेंटर सुरू झाले. तेथे डॉ. शिकलगार कार्यरत आहेत. तेथील कोविड बाधित होऊन प्रकृती नाजूक असलेले सुमारे १५ रुग्णांचे प्राण रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन न देता वाचवले आहेत. त्यांच्या या यशाचे प्रांताधिकारी, तहसीलदारांनीही कौतुक केले आहे. मरळी सेंटरमधून आत्तापर्यंत दोनशेवर रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांना डॉ. शिकलगार यांनी आरोग्य सेवा दिली आहे. बरे झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याकडूनही त्यांचे कौतुक होत आहे.

मरळी सेंटरचे डॉ. सुहेल शिकलगार यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांच्यामुळे चांगली सेवा सेंटरमधील रुग्णांना मिळत आहे.

-योगेश टोंपे, तहसीलदार, पाटण

Doctor Suhel Shikalgar Is Treating Covid Patients Without Remdesivir Injection Satara Positive News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT