Udayanraje Bhosale vs Shivendrasinharaje Bhosle esakal
सातारा

आठ पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; आमदार-खासदारांची प्रतिष्ठा पणाला

उमेश बांबरे

सध्या साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे.

सातारा : निवडणूक आयोगाने (Election Commission) नगरपालिकांच्या प्रारुप रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सातारा, कऱ्हाड, फलटण, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या आठ पालिकांच्या निवडणुकीचा (Municipal Election) बिगुल वाजला आहे. दोन मार्चपासून प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. स्थानिक पातळीवर आमदार, खासदारांच्या आघाड्यांच्या माध्यमातून या निवडणूका होणार असल्याने नगरपंचायतींचा (Nagar Panchayat Election) धुरळा खाली बसतानाच आता नगरपालिकांच्या निवडणुकींचा धुरळा उडणार आहे.

प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठ पालिकांच्या निवडणुकींच्या हालचाली अधिक गतीमान होणार आहेत. यामध्ये अ वर्गातील सातारा, ब वर्गातील कऱ्हाड व फलटण, तसेच क वर्गात महाबळेश्वर (Mahabaleshwar), म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या नगरपालिकांचा समावेश होत आहे. या मुदत संपलेल्या पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती आहे. सध्या या पालिकांवर स्थानिक आमदार व खासदारांच्या गटांचीच सत्ता आहे. आता नव्या प्रभाग रचनेत काही बदल होणार आहेत. मोठ्या प्रभागांची विभागणीही होणार आहे. त्यामुळे पालिकांचे पूर्वीच्या आणि नव्याने होणाऱ्या या प्रभाग रचनेत काही बदल होणार आहेत.

पालिकांच्या अ, ब, क व ड वर्गवारीनुसार २०८ सदस्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यानुसार दोन मार्चपासून प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे सात मार्च, प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय व पालिकांच्या कार्यालयात तसेच वेबसाईटवर प्रसिध्द करणे दहा मार्च, या कच्च्या प्रारुपावर हरकती, आक्षेप मागविण्यासाठी दहा ते १७ मार्च मुदत राहणार आहे. दाखल झालेल्या हरकती, आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी २२ मार्चपर्यंत मुदत असेल. हरकती व आक्षेपावर अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविण्याची मुदत २५ मार्च असेल. राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचनेस एक एप्रिलपर्यंत मान्यता देणार आहे. पाच एप्रिलला जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचना प्रसिध्द करणार आहे.

साताऱ्यात सध्या खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची (Shivendrasinharaje Bhosle) नगरविकास आघाडी विरोधात आहे. त्यामुळे यावेळेसही दोन्ही राजांच्या आघाड्यातच लढत होणार आहे. कऱ्हाड, फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द भाजप अशी लढत असणार आहे. उर्वरित पालिकांत स्थानिक आमदारांच्या पॅनेल विरोधात स्थानिक नेते अशी लढत होणार आहे. त्यामुळे पालिकांच्या या निवडणूका आमदार, खासदारांसह सर्वांसाठी प्रतिष्ठेच्या असणार आहेत. शहरी भागात भाजपचे असलेले वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना आघाडी म्हणून एकत्र येणार का, याचीही उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT