कऱ्हाड (जि. सातारा) : गाय आणि म्हशीच्या दूध दरात दोन महिन्यांपूर्वी झालेली घसरण शेतकऱ्यांच्या मुळावर आली होती. मात्र, सध्या दुधाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोन महिन्यांत तब्बल दोन लाख 14 हजार 600 लिटर दुधाची वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत दूध पावडरला चांगला दर मिळत आहे. त्याचबरोबर दुधाची मागणीही वाढू लागल्याने दुधाची आवक वाढूनही दूध दरात घसरण झालेली नाही. सध्या म्हशीच्या दुधाला 35 ते गायीच्या दुधाला 22 ते 25 रुपयांचा दर फॅटनुसार मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना "अच्छे दिन' आले आहेत.
शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे बघतात. त्यातून शेतकऱ्यांना चार पैसे जादाचे मिळून त्यांचा घरखर्च व इतर खर्च भागतो. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी दूध उत्पादनाकडे वळलेला आहे. मे, जून आणि जुलै महिन्यात गाय व म्हशीच्या दुधाची आवक जेमतेम असूनही दर गडगडलेले होते. कोरोना संकटामुळे लॉकडाउन करण्यात आला होता. त्यामुळे अनेक व्यवसाय, उद्योग, हॉटेल, टपऱ्या बंद राहिल्या. परिणामी, दुधाची मागणीही कमी झाली. त्यातच जागतिक बाजारपेठेत दूध पावडरच्या दरातही मोठी घसरण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील संघांकडे मोठ्या प्रमाणात दूध पावडर पडून होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे ते रडकुंडीला येऊन जनावरे विकण्याच्या मार्गावर आले होते.
मात्र, जसजसे लॉकडाउन शिथिल करण्यात आले, तशी दुधाची मागणी वाढू लागली. त्यामुळे दुधाचा उठावही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. उद्योग-व्यवसाय, हॉटेल, टपऱ्या सुरू झाल्याने दुधाची मागणी वाढली. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत दूध पावडरलाही चांगला दर मिळू लागला आहे. त्यातच सध्या एक लाख लिटरहून अधिक दुधाची आवकही वाढली आहे. आवक वाढली की बाजारपेठेत दर गडगडतात. मात्र, दुधाची आवक वाढली असली तरीही मागणी वाढल्यामुळे दरही चांगला मिळत आहे. सध्या म्हशीच्या दुधाला 35 तर गाईच्या दुधाला 22 ते 25 रुपयांचा दर फॅटनुसार मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना "अच्छे दिन' आले आहेत.
जिल्ह्यातील दूध आवक अशी...
जुलै : म्हैस दूध - 1 लाख 56 हजार 500 लिटर
-गाय दूध - 11 लाख 28 हजार 400 लिटर
ऑगस्ट : म्हैस दूध - 1 लाख 68 हजार 500 लिटर
-गाय दूध - 11 लाख 28 हजार लिटर
सप्टेंबर : म्हैस दूध - 2 लाख 67 हजार 700 लिटर
-गाय दूध - 12 लाख 43 हजार 400 लिटर
एकूण दूध वाढ - 2 लाख 14 हजार 600 लिटर
सातारा जिल्ह्यात तब्बल दोन लाख 14 हजार 600 लिटर दुधाची वाढ झाली आहे. मात्र, मागणी वाढत असल्यामुळे दुधाचे दरही चांगले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे चांगले मिळत आहेत.
-अतुल रासकर, दूध संकलन पर्यवेक्षक, सातारा
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.