Milk Rate esakal
सातारा

Milk Rate : शेतकऱ्यानं जगायचं तरी कसं? कांद्यापाठोपाठ दूध दरातही मोठी घसरण

सध्या दराअभावी कांदा (Onion Rate) शेतकऱ्याच्या दारातच सडत आहे.

मनोज पवार

एका गायीला पाठीमागे शंभर रुपये पदरमोड करून दूध व्यवसाय करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल दूध उत्पादक शेतकरी (Farmers) करत आहेत.

तिरकवाडी : सध्या दराअभावी कांदा (Onion Rate) शेतकऱ्याच्या दारातच सडत आहे. तर दुधाचे दर (Milk Rate) घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे. एका गायीला (Cow) दररोज पेंड व चारा याचा खर्च पाचशे रुपये होत असून, दुधातून चारशे रुपये मिळत आहेत.

एका गायीला पाठीमागे शंभर रुपये पदरमोड करून दूध व्यवसाय करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल दूध उत्पादक शेतकरी (Farmers) करत आहेत. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दुधासाठी लिटरला ३८ रुपये दर मिळत होता. त्यावेळी चार पैसे शिल्लक राहत होते; परंतु सध्या दर २४ रुपयांवर आला आहे. प्रत्यक्षात मात्र ३१ अथवा ३२ रुपये दर मिळत आहे. ५० किलो पेंडीचं पोतं १६५० रुपये तर ४५ किलो भुश्‍याचे पोते तेराशे रुपयांना मिळत आहे. एका गायीला दररोज सहा किलो पेंड व दोन किलो भुस्सा तसेच वैरण असा पाचशे रुपयांचा खर्च होत आहे.

याबाबत वांजळे-वडले (ता. फलटण) येथील दूध उत्पादक शेतकरी अमोल नाळे म्हणाले, ‘माझ्याकडे ७० गायी असून, दिवसाला ४२० लिटर सरासरी एक गायी सरासरी १३ ते १४ लिटर दूध देते. ४२० लिटरचे ३२ रुपयांनी १३ हजार ४४० रुपये होत आहेत. तर पेंड व चाऱ्याचा खर्च १५ हजार रुपये होतो. रोजचा दीड ते दोन हजार रुपये तोटा कोठून भरून काढणार? शासनाने दूध दरात लक्ष न घातल्यास दूध व्यवसाय अडचणीत येऊन बंद पडण्याची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिरातील धार्मिक कार्यात असायचा सहभाग, पण मागे सुरू होतं भलतंच; टिन्नू यादवच्या कारनाम्याने अयोध्या हादरली!

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला डेब्यू का मिळालं नाही? संजय मांजरेकरांनी सांगितलं मोठं कारण

दुचाकीवर आई-वडील नशेत, ४ महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडलं; ४०० मीटरपर्यंत लक्षातच आलं नाही, नंतर... पोलिसांनी सांगितली धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात पावसाची दांडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Marleshwar Waterfall Route : मार्लेश्वरला जाण्याचा विचार करताय? मग, 'हा' रस्ता पुढील 4 महिन्यांसाठी पूर्णपणे राहणार बंद; देवस्थानने का घेतला असा निर्णय?

SCROLL FOR NEXT