सातारा

कोरेगाव तालुका कृषी कार्यालय पडक्या इमारतीमधून धोकादायक इमारतीत

पांडुरंग बर्गे

शेतकऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

कोरेगाव : येथील लक्ष्मीनगरातील कोरेगाव तालुका कृषी कार्यालय स्वमालकीच्या पडक्या इमारतीमधून कोरेगाव शेती उत्पन्न बाजार (Koregaon Agricultural Produce Market ) समितीच्या मालकीच्या ‘शेतकरी भवन’ (farmers building ) या धोकादायक ठरू शकणाऱ्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. या स्थलांतराला ‘आगीतून उठून फुफाट्यात’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यात अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे, हेही नाकारून चालणार नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, सन २००० मध्ये येथील लक्ष्मीनगरातील जुन्या रेल्वेच्या एका प्लॉटमध्ये शासकीय निधीतून बांधलेल्या सुसज्ज आरसीसी इमारतीत कृषी कार्यालय सुरू झाले. थोडे दिवस ही इमारत चांगली राहिली. नंतर इमारतीच्या निकृष्ट कामामुळे पावसाळ्यात इमारतीचा छत हळूहळू गळू लागला. प्रारंभी अगदी अल्प प्रमाणात गळत असलेला छत पुढे पुढे जादा गळू लागला. तसेच इमारतीच्या भिंतीना तडे जाऊ लागले. फरशा मोठ्या प्रमाणात उखडू लागल्या. स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली, गळती आणि भिंतींना तडे वाढू लागल्यामुळे कार्यालयीन कामकाज करणे प्रचंड गैरसोयीचे होऊ लागले. कार्यालयातील कागदपत्रे, दस्तावेज असलेली कपाटे, रॅकही गळतीने मोठ्या प्रमाणात खराब होऊ लागले.

वारंवार तात्पुरती दुरुस्ती वगैरे करून कामकाज सुरू होते. कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना दैनंदिन काम करणे कठीण होत होते. आपल्या काही कामांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा देण्यात अडचणी येत होत्या. शेतकरीही त्रस्त झालेले होते. गळती, भिंतींना गेलेल्या तड्यांमुळे छत व भिंती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असताना चार महिन्यांपूर्वी कार्यालयाच्या पाठीमागची मोठी भिंत अचानक कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. इमारत अगदी दुरुस्तीपलीकडे गेल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’करून घेण्यात आले. त्यात ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल आला. दरम्यान, धोकादायक इमारतीत कार्यालय सुरू असल्याबाबत विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्नही उपस्थित झाला. शेवटी हे कृषी कार्यालय अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात झाला. त्यासाठी इमारत भाड्याने घेण्यासाठी शहरात अनेक इमारती पाहण्यात आल्या. मात्र, योग्य इमारत मिळत नव्हती. शेवटी ‘शेतकरी भवन’ ही इमारत निवडण्यात आली.

निवडण्यात आलेल्या शेतकरी भवन इमारतीत यापूर्वी १५ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह सुरू होते. मुळातच ही इमारत सुमारे २५ वर्षांपूर्वी बांधल्यापासून तशी पडूनच होती. तिचा फारसा वापर होत नसे. या इमारतीलाही बांधल्यापासून गळतीचे ग्रहण लागलेले होते. फरशा, पायऱ्या उखडत होत्या. अन्य बऱ्याच अडचणी होत्या. गळतीसह किरकोळ दुरुस्ती करून तेथे वसतिगृह सुरू झाले. मात्र, गळती कायम होती. पण, निधी असूनही वसतिगृह बांधण्यासाठी पुरेशी जागा मिळत नव्हती. चांगली इमारत भाड्याने मिळत नव्हती. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या इमारतीत वास्तव्य करत होते. वादळी वारा, विजेचा कडकडाट, पावसाळ्यात हे विद्यार्थी रात्र रात्र जागून काढत असत. अखेर दोन वर्षांपूर्वी या वसतिगृहास येथील संभाजीनगरात चांगली इमारत भाड्याने मिळाल्याने तेथे वसतिगृह स्थलांतरित करण्यात आले.

आता याच इमारतीत पुन्हा किरकोळ दुरुस्त्या करून सप्टेंबर २०२१ मध्ये कृषी कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर हे कार्यालय असून, त्याखाली धान्य पोती दुरुस्ती व पोत्यांचे गोदाम, चार ते पाच गाळे आहेत. त्यातील एका गाळ्यात एका साखर कारखान्याचे गट कार्यालय व अन्य एक शासकीय कार्यालय आहे. कृषी कार्यालय सुरू झालेली ही इमारत एकूणच धोकादायक दिसते आहे. तरीही येथे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे दैनंदिन काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मूळ इमारतीची चौकशी करा

कोरेगाव तालुका कृषी कार्यालयाची मूळ इमारत आरसीसीमध्ये सुमारे २० वर्षांपूर्वी बांधलेली असताना ती इतक्या लवकर कशी पडू शकते? तिची दुरवस्था कशी होऊ शकते, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे मूळ इमारतीच्या बांधकामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, मूळ इमारत पाडून तेथे किंवा अन्यत्र नवीन जागेत इमारत तातडीने बांधून तेथे कार्यालय स्थलांतरित करावे, अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT