सातारा

माण तालुक्यातील कोरोनाबाधित महिलेच्या अंत्यसंस्कारास शंभरीच्यावर ग्रामस्थांची उपस्थिती, साताऱ्यातील रुग्णालयाच्या बेजाबदारपणामुळे घडली घटना

रुपेश कदम

दहिवडी (जि.सातारा) : एका महिलेच्या मृतदेहावर पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार केल्यानंतर संबंधित महिला कोरोनाबाधित असल्याचे समजल्याने सर्वांची घाबरगुंडी उडाली. या विचित्र प्रकारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला जबाबदार कोण अन् ही अक्षम्य चुक नक्की कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माण तालुक्यातील पांढरवाडी येथील एक महिला उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. तिच्यावर मागील आठ दहा दिवस झाले उपचार सुरु होते. परंतु त्या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे गुरुवार सहा ऑगस्टला संबंधित महिलेचा स्वॅब घेण्यात आला. दरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाला. चोवीस तास रुग्णालयात ठेवल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच संबंधित महिलेचा मृतदेह रुग्णालयाने कोरोनाबाबतची कोणतीही काळजी न घेता नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पहिल्या प्रयत्नातील चुका सुधारून त्याने रोवला यूपीएससीत झेंडा

एका शववाहिकेतून संबंधित महिलेचा मृतदेह पांढरवाडी येथे आणण्यात आला. त्या मृतदेहावर शुक्रवार (ता. सात)  सकाळी पारंपारिक पध्दतीने सर्व धार्मिक विधी करुन साधारण शंभरच्या आसपास नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर शनिवारी (ता. 8)  सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीत संबंधित महिला कोरोना बाधित असल्याचे जाहिर करण्यात आले. अहवाल समजताच प्रशासनासह ग्रामस्थांची तारांबळ उडाली. अंत्यसंस्कारास उपस्थितीत असणार्यांची तर बोबडीच वळाली. आरोग्य यंत्रणेने तत्काळ पुढील पावले उचलण्यास सुरुवात केली.

कोयना जलाशयातील अडल्या-नडलेल्यांचा देवदूत!

त्यामुळे आज (रविवार) सकाळी होणारा सावडणेचा विधी रद्द करण्यात आला. संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. संबंधित महिलेच्या स्वॅबचा अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह कोरोनासंबंधित काळजी न घेता आहे तसाच नातेवाईकांच्या ताब्यात देणे यात त्या खाजगी रुग्णालयाची निष्काळजीपणा व बेफिकिरीपणा दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT