सातारा

'या' 40 गावांचे नागठाण्याच्या आदर्शाचे अनुकरण

सुनील शेडगे

नागठाणे (जि.सातारा) : येथे यंदा "एक गाव, एक गणपती' चा निर्धार करण्यात आला आहे. गावच्या सांस्कृतिक इतिहासात प्रथमच हा आगळा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य, विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत बोरगाव पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. परिसरातील सुमारे 40 गावांतही या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या दृष्टीनेही ही घटना उल्लेखनीय मानली जात आहे. बैठकीत डॉ. वाघ यांनी कोरोना रुग्णांची संख्या, वाढत्या गर्दीमुळे होणारा रोगाचा प्रसार, त्यातून निर्माण होणारे संभाव्य धोके याची ग्रामस्थ व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देवून "एक गाव, एक गणपती' संकल्पना राबविण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतीनेही त्यांच्या या निर्णयाला अनुमती दिली.

सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेऊ नये : शिवेंद्रसिंहराजे

बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला. बैठकीत गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री चौंडेश्वरी देवी मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरविण्यात आले. गणेशोत्सव काळात प्रत्येक दिवशी ठरवून दिलेल्या मंडळांच्या पाच कार्यकर्त्यांनी श्री गणेशाची पूजा-अर्चा करावी, असाही निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सरपंच विष्णू साळुंखे, सोसायटीचे अध्यक्ष संजय साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य संतोष साळुंखे, राजेंद्र साळुंखे, शंकर सुतार, अमीन शिकलगार, पोलिस पाटील रमेश साळुंखे, गावातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

रिक्षा चालक मालकांच्या ठाकरे सरकारला साकडे

कॅबिनेटच्या बैठकीत याची चर्चाच नाही, राजू शेट्टींसह राज्यातील आंदाेलकांचा हिरमाेड 

नागठाण्याच्या आदर्शाचे अनुकरण 

नागठाण्यातील या आदर्शाचे अुनकरण परिसरातील अन्य गावांनीही केले आहे. त्यानुसार भरतगाव, भरतगाववाडी, अतित, काशीळ, कामेरी, नांदगाव, जांभगाव, समर्थगाव, निसराळे, तुकाईवाडी, सायळी (पुनर्वसित), भाटमरळी, धनवडेवाडी, कुमठे, आष्टे (पुनर्वसित), जावळवाडी, परमाळे, मापरवाडी, पिलाणीवाडी, खोजेवाडी, देशमुखनगर, टिटवेवाडी, वेचले, वळसे, लिंबाचीवाडी, शिवाजीनगर, कोपर्डे, आसनगाव, राकुसलेवाडी, कुसवडे, कौंदणी, नरेवाडी, धोंडेवाडी, फत्यापूर, सोनापूर, गणेशवाडी या गावांनीही "एक गणपती'चा निर्णय घेतला आहे.

लंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं?  सातारच्या छत्रपतींचा हा सेनापती डायरेक्‍ट लंडनला!

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT