esakal esakal
सातारा

पिंपोड्यात 65 हेक्‍टर पिकांची मोठी हानी; शेतकऱ्यांना अश्रू अनावर

कोरेगाव तालुक्‍याच्या उत्तरेकडील भागात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राहुल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : कोरेगाव तालुक्‍याच्या उत्तरेकडील भागात काल झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात मोठा भांडवली खर्च करून जगवलेली पिके वाया गेली आहेत. पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, दहिगाव, घिगेवाडी, वाघोली, अनपटवाडी या परिसरातील 65 हेक्‍टरांवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

अचानक आलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने कलिंगडे, गोट कांदा, ऊस, शिमला मिरची, सितारा मिरची, गहू, भुईमूग, पपई, डाळिंब, मका तसेच तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले. आंब्याचा मोहोर गळून पडला. झाडांना लगडलेल्या कैऱ्या जमीनदोस्त झाल्या. शेतात अर्धा फूट साचलेला गारांचा थर आज सकाळपर्यंत विरघळला नव्हता. यावरून या गारपिटीची भीषणता लक्षात येते. गारांमुळे उरली सुरली पिकं अक्षरशः नासून गेलीत. गोट कांद्याच्या फुलांचा जमिनीवर खच पडला होता. त्यातील बी मातीत झडले आहे. उसाच्या पानांच्या तर चिंध्या झाल्या आहेत. शेतातील मोठमोठी झाडे बोडकी झाली आहेत. लाखो रुपयांचा केलेला खर्च मातीमोल झाल्याने अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

दरम्यान, आमदार दीपक चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल, यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी सरकार दरबारी आवश्‍यक असलेली सर्व कार्यवाही मी स्वतः तातडीने करीन, अशी ग्वाही आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिली. या वेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, सरपंच नैनेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, मंडलाधिकारी उमेश डोईफोडे, तलाठी सुहास सोनावणे, धनसिंग साळुंखे, दिलीप लेंभे, हमीद इनामदार, इलाही इनामदार, शिवाजी निकम, अशोक निकम, माजी सरपंच मछिंद्र केंजळे यांच्यासह अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सायबर ठगीचा नवा फंडा! एक WhatsApp ग्रुप अन् ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला बसला १.०६ कोटींचा फटका, नेमकं काय घडलं?

IND vs SA, 3rd ODI: Yess... जिंकलो! केएल राहुलने कॉईन उडवण्यासाठी लढवली शक्कल, टॉस जिंकताच कशी होती भारतीय खेळाडूंची रिअॅक्शन

प्राजक्ता- शंभुराजने नंदीवरून रिसेप्शनला घेतलेली एंट्री मुळीच चुकीची नव्हती... ज्योतिषांनीच सांगितलं कारण; म्हणाले- शास्त्रानुसार...

Nanded Train: महाराष्ट्राशी जोडला गेला यूपीचा हा जिल्हा; आठवड्यातून एकदा करता येणार प्रवास, केंद्रीय मंत्र्यांचे प्रयत्न झाले यशस्वी

Year Ender 2025 : 15 हजारपेक्षा कमी किंमतीचे 2025 मधील Top 5 Best 5G Smartphones

SCROLL FOR NEXT